Home / क्रीडा / भारतीय हॉकी संघाचे मायदेशी जंगी स्वागत

भारतीय हॉकी संघाचे मायदेशी जंगी स्वागत

नवी दिल्ली- पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा भारतीय संघ आज मायदेशी परतला. नवी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ढोलताशाच्या गजरात...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा भारतीय संघ आज मायदेशी परतला. नवी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ढोलताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी खेळाडू भारावून गेले. त्यांनी भांगडा नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला.माध्यमांशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला, देशासाठी पदक जिंकणे ही मोठी बाब असते. आम्ही सुवर्ण पदकाचे स्वप्न पाहत होतो, आमचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. मात्र, आम्ही रिकाम्या हाताने आलो नाही. आमच्यावर लोकांनी विश्वास ठेवल्यामुळे आमची जबाबदारी वाढते. आम्ही देशासाठी सुवर्ण पदक आणण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या