Home / क्रीडा / भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठली

भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठली

पॅरिस – पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने आज ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. ब्रिटन आणि भारताचा सामना बरोबरीत सुटल्याने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पॅरिस – पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने आज ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. ब्रिटन आणि भारताचा सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. त्यात भारताने ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी घातली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंना एकही पदक मिळवता आले नाही. पुरुषांच्या ७१ किलो उपांत्‍यपूर्व फेरीत भारताचा बॉक्सर निशांत देव मेक्‍सिकोच्‍या मार्को व्हर्डेशीकडून पराभूत झाला. यानंतर भारताची स्टार महिला बॉक्सर (मुष्टीयोद्धा) लोव्हलिना बोर्गोहेन हिलाही ७५ किलो वजनगटात उपांत्‍यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने २२-२० आणि २१-१४ ने पराभूत केले. आता त्याची कांस्यपदकासाठी लढत होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या