Home / देश-विदेश / सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर 5 टक्के! आरोग्य व आयुर्विमावर जीएसटी रद्द

सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर 5 टक्के! आरोग्य व आयुर्विमावर जीएसटी रद्द

GST Slam


नवी दिल्ली- आज जीएसटी कौन्सिलची बैठक झाल्यानंतर रात्री 10 वाजता वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले की, आता फक्त 5 टक्के व 18 टक्के या दोन श्रेणीच राहतील. आजचे निर्णय 22 सप्टेंबरपासून लागू येतील. सामान्य माणसांना लागणाऱ्या बहुतांश वस्तू आणि आरोग्य व आयुर्विमा योजनांना जीएसटी लागणार नाही.-
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जीएसटीत दिलासा द्या असे पंतप्रधान गेले सात ते आठ महिने आग्रही होते. आजच्या निर्णयामुळे जीएसटी संकलन कमी होणार आहे आणि त्यामुळे राज्यांना मिळणारा हिस्सा कमी होणार आहे. याबाबत विचारले असता सांगण्या आले की, जीएसटी संकलन 48 हजार कोटींनी कमी होणार आहे, पण वस्तूंची किंमत कमी झाल्याने मागणी वाढेल आणि त्याचा एकूण चांगला परिणाम होईल.
शून्य टक्के जीएसटी- पनीर, भारतीय ब्रेड(रोटी, परोठा इ.), जीवनावश्यक वस्तू, आयुर्विमा, आरोग्य विमा.
5 टक्के जीएसटी (या वस्तूंवर आधी 12 ते 18 टक्के जीएसटी होता)- तेल, साबण, टूथब्रश, सायकल, शेती अवजारे, चॉकलेट, भुजिया, कॉर्नफ्लेक्स, ट्रॅक्टर, नॅचरल मेन्थॉल, चमड्याच्या वस्तू, ग्रॅनाईट, लोणी, तूप, मीठ, सोया, खतासाठी लागणारी ॲसिड, फळे, चष्मे.
18 टक्के जीएसटी- एसी, टीव्ही, छोट्या गाड्या, सिमेंट, बस, ट्रक, रुग्णवाहिका, ऑटो पार्ट, तीन चाकी, मोटारसायकल.
40 टक्के जीएसटी- तंबाखू, सिगारेट, झर्दा, खाजगी हेलिकॉप्टर, खाजगी यॉट, खाजगी विमाने.