कर्नाटक काँग्रेस आमदारांना ५० कोटी निधी! भाजपाची टीका

₹50 crore fund for Karnataka Congress MLAs! BJP criticizes

₹50 crore fund for Karnataka Congress MLAs! BJP criticizes


बंगळुरु – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या(Karnatka CM) यांनी कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना प्रत्येक मतदारसंघासाठी ५० कोटी रुपयांचा(₹50 crore fund) विकासनिधी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर विरोधी भाजपाने जोरदार(Congress vs BJP) टीका केली आहे. दरम्यान भाजपाच्या काळात आमदारांना असा निधी दिला होता आणि त्यावेळी भाजपानेही काँग्रेस व जनता दल संयुक्तच्या आमदारांना निधी दिला नव्हता, याची आठवण काँग्रेसने करून दिली आहे.(BJP criticizes karnatka gov.)
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या राज्याच्या दौऱ्याआधीच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पायाभूत सुविधा विकास योजना घोषित केली. या योजनेनुसार मतदारसंघातील कामांसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. भाजपाचे विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी म्हटले आहे की, सिद्धरामय्या कर्नाटक सरकारचा निधी आपल्या पक्षाचाच निधी(Congress fund allocation) असल्याचे समजत आहेत. ते केंद्र सरकारवर सापत्न वागणूक दिल्याचा आरोप करत असतात. मात्र प्रत्यक्षात राज्यात तेच करत आहेत. भाजपाचे आमदारही लोकांनी निवडून दिलेले आहेत. केवळ काँग्रेसला मते दिलेल्यांनाच निधी हे चुकीचे आहे.यावर गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी म्हटले आहे की, या पक्षपातीपणाची सुरुवात भाजपाने केली होती. भाजपा सरकारच्या काळात आम्हालाही मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देण्यात आला नव्हता. त्याकाळात माझ्या कोराटगेरे या मतदारसंघासाठीही भाजपाने निधी दिला नव्हता.