150 Years of Vande Mataram : वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला (National song Vande Mataram) १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रम पार पडले. दिल्लीच्या इंदिरा गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी वंदे मातरममधील वगळलेला भाग गात राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. काँग्रेसने (Congress)या गीताचे तुकडे केल्याचा आरोप केला. यावेळी नवीन टपाल तिकिट आणि नाणेही जारी करण्यात आले. दरम्यान, आरएसएने (RSS) अनेक दशके आपल्या मुख्यालयात जन गन मन, वंदे मातरम गायले नाही, असा आरोप केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंकिमचंद्र चॅटर्जी (Bankim Chandra Chatterjee)यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी वंदे मातरम रचले. १८८२ मध्ये आनंदमठ या कादंबरीत ही रचना प्रकाशित झाली. ही सहा कडव्यांची (six-stanza composition) रचना ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध (British rule)स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्याची प्रेरणा ठरले. रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी १८९६ मध्ये कोलकात्यातील काँग्रेस अधिवेशनात हे गाणे सादर केले. यामुळे स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य मिळाले. पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी मूळ कवितेतील दुर्गा आणि तीन हिंदू देवींचा (Goddess Durga and other Hindu deities)उल्लेख असलेली कडवी मुस्लिम समाजाचा विरोध होईल, म्हणून वगळली. १९३७ मध्ये पंडित नेहरू (Jawaharlal Nehru)व सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose)यांच्यातील पत्रव्यवहारातूनही ही बाब स्पष्ट होते.
वन्देमातरम् के सामूहिक गान के हर स्वर में राष्ट्रभक्ति, एकता और समर्पण की अद्भुत गूंज सुनाई दे रही थी। इस प्रस्तुति ने हर किसी को एक बार फिर यह अनुभव कराया कि वंदेमातरम् केवल एक गीत नहीं, बल्कि भारत की आत्मा की अभिव्यक्ति है। pic.twitter.com/edq7j6sBAa
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2025
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी म्हटले की, काँग्रेसला जन गण मन आणि वंदे मातरम् यांचा अभिमान आहे आणि ही गाणी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात गायली जातात. मात्र आरएसएस आणि भाजप त्यांच्या शाखा किंवा कार्यालयांमध्ये कधीही या गाण्यांचे गायन करत नाहीत. १९२५ मध्ये स्थापन झाल्यापासून आरएसएसच्या कार्यक्रमात केवळ नमस्ते सदा वत्सले हेच गीत गायले जाते.
Sharing my message on the 150th Anniversary of India’s National Song – Vande Mataram
— Mallikarjun Kharge (@kharge) November 7, 2025
Today marks 150 years of Vande Mataram— India’s National Song, that awakened the collective soul of our nation and became the rallying cry for freedom. Composed by Bankim Chandra Chattopadhyay,… pic.twitter.com/toPYgckiiH
हे देखील वाचा –
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना पुत्र प्राप्ती
सँडहर्स्ट रोड रेल्वे अपघात; कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती









