येमेनमधील भारतीय परिचारिका निमिषाच्या मृत्यूदंडाला स्थगिती


येमेन – दररोजच्या अत्याचाराला कंटाळून आपल्या येमेन (Yemen)नागरिक असलेल्या भागीदाराची हत्या करणाऱ्या भारतीय परिचारिकेच्या मृत्यूदंडाला स्थगिती मिळाली आहे. निमिषाला (Nimisha Priya)१६ जुलै रोजी मृत्यूदंड देण्यात येणार होता. प्रभावशाली धार्मिक नेते व कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.
निमिषाच्या मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यासाठी केरळमधील अनेक स्वयंसेवी (indian nurse from Kollengode )संस्था कार्य करत होत्या. येमेनेमधील प्रसिद्ध सूफी विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज हे चर्चा करत असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व मृताचा भाऊ यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. भारतातील कंठापूर येथील मुफ्ती एपी अबुबकर मुसलियार यांनी या कामी पुढाकार घेतला. पिडीत कुटुंबाने अद्याप ब्लड मनी स्विकारण्यास किंवा माफी देण्याचा निर्णय घेतलेला नाही. येमेनच्या कायद्यानुसार केवळ या दोनच बाबींवर मृत्यूदंड रोखता येतो. निमिषा हिने २०१७ मध्ये तिचा भागीदार (business partner)असलेल्या येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची ड्रगचा (drugs)ओव्हरडोस देऊन हत्या केली होती असा तिच्यावर आरोप आहे. महदीने तिचा पासपोर्ट जप्त केला होता व तिचा छळ केला होता.