Home / देश-विदेश / Delhi Riots Case : दिल्ली दंगलीतील 3 आरोपी निर्दोष ;पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले

Delhi Riots Case : दिल्ली दंगलीतील 3 आरोपी निर्दोष ;पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले

Delhi Riots Case : ईशान्य दिल्लीतील गोकुळपुरी(Gokulpuri area)भागातील जन्नती मशिदीत (Jannati Mosque) २०२० साली तोडफोड, जाळपोळ आणि लूट केल्याप्रकरणी अटक...

By: Team Navakal
Delhi Riots Case
Social + WhatsApp CTA

Delhi Riots Case : ईशान्य दिल्लीतील गोकुळपुरी(Gokulpuri area)भागातील जन्नती मशिदीत (Jannati Mosque) २०२० साली तोडफोड, जाळपोळ आणि लूट केल्याप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. शहरातील पोलिसांनी या दंगलप्रकरणी केलेल्या तपासाच्या दर्जावर कठोर टीका आणि ताशेरे ओढत दिल्लीतील न्यायालयाने(Delhi court)हा निकाल दिला.

कर्करडूमा न्यायालयांचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश परवीन सिंग (Additional Sessions Judge Parveen Singh)यांनी दीपक, प्रिन्स आणि शिव या तिघांची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले की, या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास करण्यात आला त्यामुळे मला दुःख झाले आहे. कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना अटक करून आरोपपत्र दाखल केले. अटक झाल्यापासून पहिले आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपींचा कथित गुन्ह्याशी संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा नव्हता.

तब्बल दीड वर्षांनंतर दोन तथाकथित साक्षीदार तपासण्यात आले. मात्र या साक्षीही संशयास्पद होत्या. ज्या ठिकाणी साक्षीदारांची चौकशी केल्याचा दावा केला होता ते ठिकाण संबंधित तारखेला अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे साक्षीदारांची चौकशी झाली की नाही याबाबत गंभीर शंका निर्माण होते. भविष्यात तपास यंत्रणांनी तपासात सुधारणा करावी या अपेक्षेने ही निरीक्षणे नोंदवण्यात येत आहेत. एखाद्या नागरिकाला गुन्ह्यात गोवण्यास पुरेसा व विश्वासार्ह पुरावा नसेल तर त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य बाधित होऊ नये.

आरोपींची अटक प्रामुख्याने कथित घटनेच्या व्हिडिओ फुटेज असलेल्या सीडींवर आधारित आहे.मात्र ही सीडी एका गुप्त माहितीदाराने दिल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु सरकारी पक्ष न्यायालयात या ध्वनिचित्रफिती कायदेशीररीत्या सिद्ध करू शकला नाही आणि हीच त्रुटी महत्वाची ठरली. त्यामुळे सर्व आरोपांतून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


हे देखील वाचा – 

रेल्वे वेळापत्रकात १ जानेवारीपासून मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या प्रवासाचा अचूक वेळ..

भाजपाला अहंकार चढला! आम्हाला झुलवत ठेवले शिंदे सेनेने आरोप करीत 12 ठिकाणी युती तोडली

उपर्‍यांना उमेदवारी का दिली?आम्ही निष्ठावंतांनी काय करायचे?

Web Title:
संबंधित बातम्या