Ladakh violence – लडाख हिल कौन्सिलची(Ladakh Hill Council) निवडणूक आहे . अशा राजकीय स्थितीत लडाखच्या प्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उपसमितीशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीत ही बैठक होणार आहे.
लेह शिखर परिषद आणि कारगिल डेमॉक्रेटीक अलायन्स या दोन्ही संस्थांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी , लडाखचे खासदार मोहम्मद हनीफ जान आणि त्यांचे वकील या बैठकीत सहभागी होणार आहेत. लेह शिखर परिषदेचे अध्यक्ष चेरींग दोरजे लाकरुक यांनी ही माहिती दिली.
या बैठकीत लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आणि राज्य घटनेतील सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षण देणे या दोन प्रमुख मागण्या या बैठकीत लडाखचे प्रतिनिधी करणार आहेत.
यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी लेह शिखर परिषदेने ६ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीसोबत बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता. वांगचूक यांची कैदेतून मुक्तता केली तरच बैठकीला येऊ असा त्यांचा पवित्रा होता . मात्र आता ते चर्चेला तयार झाले आहेत.
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आणि घटनात्मक सुरक्षा देण्याच्या मागणीवरून लडाख शिखर परिषदेने २४ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या बंददरम्यान हिंसक निदर्शने झाली. आंदोलनकर्ते आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या संघर्षात चार जणांचा बळी गेला. या आंदोलनाचा चेहरा असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले. तेव्हापासूनच ते राजस्थानमधील कारागृहात आहेत. ७० जणांना दंगलीत सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या सर्वांची सुटका करण्याची मागणीही बैठकीत करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा–
पुण्यातील फरार गुंडाच्या राजकीय संबंधांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा गोंधळ?
पंतप्रधान मोदींनी केली आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक..