Air Fair Regulation : इंडिगोच्या वाढत्या संकटानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. ज्यामुळे इंडिगोच्या संकटामुळे आधीच बिथरलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या विक्रमी वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आणि सरकारने देखील यावर कठोर पॉल उचलेले दिसत आहे. काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत सरकारने गंभीर सूचना दिल्या आहेत.
याव्यतिरिक्त, प्रवाशांना जास्त भाडे देण्यापासून रोखण्यासाठी मंत्रालयाने भाडे मर्यादा देखील लागू केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांना नवीन भाडे मर्यादांचे पालन करणे हे बंधनकारक असल्याचे देखील सांगितले आहे,आणि हे बंधन परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू राहतील.
या संकटकाळी, मंत्रालयाने विमान भाड्याचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्याचा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमान कंपन्यांवर तडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आकाशाला भिडणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती आटोक्यात येतील.
इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर इतर विमान कंपन्यांचे भाडे चांगलेच वाढले आहे त्यामुळे सर्वसामान्यांची चांगलीच लूट सुरु आहे. दिल्ली ते मुंबईचे भाडे सामान्यतः ६,००० रुपये असते, ते आता सुमारे ७०,००० रुपये एवढे आहे. दिल्ली ते पाटणा हे भाडे जे सामान्यतः ५,००० रुपये असते,आणि आता ते ६०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आणि याचबरोबर दिल्ली ते बेंगळुरू हे भाडे सामान्यतः ७,००० रुपये असते, ते आता १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्ली ते चेन्नईचे भाडे तर ९०,००० रुपये एवढे झाले आहे, तर दिल्ली ते कोलकाता भाडे सुमारे ६८,००० रुपये करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –









