Home / देश-विदेश / थोडी तरी माणूसकी दाखवा; वसतीगृहातील डॉक्टरची मागणी

थोडी तरी माणूसकी दाखवा; वसतीगृहातील डॉक्टरची मागणी

अहमदाबाद- अहमदाबाद लंडन विमान अहमदाबादच्या ज्या मेघाणी नगरमधील डॉक्टरांच्या वसतीगृहावर कोसळले त्या डॉक्टरांना वसतीगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर...

By: Team Navakal
Doctor breaks down, pleads for time to vacate BJ Medical hostel


अहमदाबाद- अहमदाबाद लंडन विमान अहमदाबादच्या ज्या मेघाणी नगरमधील डॉक्टरांच्या वसतीगृहावर कोसळले त्या डॉक्टरांना वसतीगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मी गुजरातमधील नाही. आपल्याला थोडा वेळ द्यावा अशी मागणी करणारा एका डॉक्टराचा व्हिडियो व्हायरल झाला. हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर याच डॉक्टरांनी दुसरा व्हिडियो करुन प्रशासन आम्हाला मदत करत असल्याचा व्हिडियो केला.


डॉक्टरांच्या वसतीगृहात राहणाऱ्या डॉ. अनिल पनवार यांनाही ही नोटीस देण्यात आली. वसतीगृहावर विमान पडून झालेल्या अपघातात त्यांच्याकडे घरकाम करणारी महिला व त्यांची मुलगी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे वसतीगृह सोडण्यासाठी थोडा वेळ द्या अशी मागणी त्यांनी व्हिडियोच्या माध्यमातून केली. त्यांच्याच प्रमाणे इतरही डॉक्टरांना वसतीगृह सोडणे कठीण आहे. या व्हिडियोवर लोकांनी अनेक संतप्त प्रतिक्रीया दिल्या. त्यानंतर दोन दिवसांनीच डॉ. पनवार यांनी दुसरा व्हिडियो करत प्रशासनाने आम्हाला दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी आसरा दिल्याचे सांगत त्यांचे आभार मानले. ज्या वेळी अपघात झाला तेव्हा डॉ. पनवार व त्यांची पत्नी हे ड्युटीवर होते. तर मुलगी हॉस्टेलमध्ये होती.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या