Air India Passenger Assaults – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport)एअर इंडियाच्या टर्मिनल–१ वर ड्यूटीवर नसलेला वैमानिक कॅप्टन वीरेंद्र सेजवाल (Off-Duty Pilot Virendra Sejwal)याने प्रवासी अंकित देवन यांना मारहाण (Assaults)केल्याचा धक्कादायक प्रकार झाला. या घटनेनंतर एअरलाइनने या वैमानिकाचे तत्काळ निलंबन केले. चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि रक्ताने माखलेले कपडे यांचे फोटो आणि व्हिडिओ प्रवाशाने व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

अंकित देवन यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वीरेंद्र सेजवाल यांच्या कपड्यावर रक्त (Blood)दिसते तर प्रवासी अंकित (Passenger Ankit Devan)यांची सात वर्षाची मुलगी रडत असल्याचा आवाज एकू येतो. देवन यांनी एअरइंडियाला टॅग करून लिहिले की, मी ४ महिन्यांचे बाळ, ७ वर्षाची मुलगी (seven-year-old daughter) आणि पत्नीसह प्रवास करत होतो. मला कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुरक्षा तपासणी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले.
AIX Pilot, Capt. Vijender Sejwal pic.twitter.com/Ntp1pnDgdb
— Ankit Dewan (@ankitdewan) December 19, 2025
त्यावेळी कर्मचारी रांगेत घुसखोरी करत होते. त्यांना हटकले तेव्हा पायलटने अशिक्षित (Illiterate) म्हणून अपमानास्पद भाषा वापरून मारहाण केली. त्यामुळे माझ्या नाकातून रक्त वाहू लागले. माझ्या मुलीने ही मारहाण पाहिली. ती अजूनही धक्क्यात आहे. या घटनेमुळे माझी सुट्टी खराब झाली. अशा वैमानिकाला विमान उडवण्याची परवानगी देणे धोकादायक आहे. दिल्ली विमानतळ कर्मचारी आणि लहान बाळ असलेल्या प्रवाशांचे प्रवेशद्वार एकच कसे ठेवू शकते? यामुळे गोंधळ निर्माण होतो. एवढेच नव्हे तर माझ्यावर एक पत्र लिहिण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
त्यात मी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार नाही, असे नमूद केले होते. एकतर ते पत्र लिहा किंवा माझे विमान चुकवून १.२ लाख रुपयांचे सुट्टीचे बुकिंग वाया घालवा, अशी स्थिती होती. दिल्ली पोलिसांना टॅग करून लिहिले की, मी परत आल्यानंतर तक्रार का दाखल करू शकत नाही? न्याय मिळवण्यासाठी मला माझे पैसे गमवावे लागतील का? मी दिल्लीला परत येईपर्यंतच्या २ दिवसांत सीसीटीव्ही फुटेज गायब होईल का?
प्रवाशाच्या या व्हिडिओनंतर एअर इंडियाने या घटनेची दखल घेऊन वैमानिक वीरेंद्र सेजवाल यांना निलंबित केले. चौकशीनंतर पुढील कारवाई होणार असल्याचे निवेदनात नमूद केले.
हे देखील वाचा –
आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?









