नवी दिल्ली – अहमदाबाद–लंडन गॅटविक मार्गावरील ड्रीमलाइनर विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या (Ahmedabad Air India plane crash) अडचणी वाढल्या आहेत. आज कंपनीने आठ आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत उड्डाणे रद्द (Air India International and domestic flights cancelled) केल्याची घोषणा केली. देखभाल आणि परिचालन अडचणींचा हवाला देत ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आज रद्द करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये (International flights) AI906 दुबई–चेन्नई, AI308 दिल्ली–मेलबर्न, AI309 मेलबर्न–दिल्ली आणि AI2204 दुबई–हैदराबाद यांचा समावेश आहे. तर देशांतर्गत रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये AI874 पुणे–दिल्ली , AI456 अहमदाबाद–दिल्ली , AI2872 हैदराबाद–मुंबई आणि AI571 चेन्नई–मुंबई या उड्डाणांचा समावेश आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतरच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, गेल्या 9 दिवसांत विविध कारणांमुळे एकूण 84 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 12 जून रोजी झालेल्या या अपघातात 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर, देशभरातील सर्व विमानतळांवर सुरक्षेच्या दृष्टीने विमानांची तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.