Home / देश-विदेश / Airlines extra charges seat : हवाई प्रवाशांना मोठा दिलासा: ६० टक्के जागांसाठी अतिरिक्त शुल्क रद्द; केंद्र सरकारचे विमान कंपन्यांना कडक निर्देश

Airlines extra charges seat : हवाई प्रवाशांना मोठा दिलासा: ६० टक्के जागांसाठी अतिरिक्त शुल्क रद्द; केंद्र सरकारचे विमान कंपन्यांना कडक निर्देश

Airlines extra charges seat : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. विमान...

By: Team Navakal
Airlines extra charges seat
Social + WhatsApp CTA

Airlines extra charges seat : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांकडून जागा निवडीच्या (Seat Selection) नावाखाली आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्काबाबत प्रवाशांनी नोंदवलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत, नागरी उड्डाण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या नियमांनुसार, आता प्रत्येक विमानामधील किमान ६० टक्के जागा (Seats) प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे तिकीट बुकिंगनंतरही खिशाला बसणारी आर्थिक कात्री आता थांबणार आहे.

एकच पीएनआर (PNR) असलेल्या प्रवाशांसाठी विशेष सोय-
कौटुंबिक सहली किंवा मित्रांसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेकदा एकाच पीएनआरवर तिकीट बुक करूनही विमान कंपन्या प्रवाशांना विमानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा देत असत, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असे. आता सरकारने स्पष्ट केले आहे की, एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शक्यतो एकमेकांच्या शेजारील जागा (Adjacent Seats) उपलब्ध करून देणे विमान कंपन्यांसाठी अनिवार्य असेल. यामुळे कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुसह्य होणार आहे.

पाळीव प्राणी आणि सामानाबाबत पारदर्शक धोरण-
विमान प्रवासादरम्यान सोबत नेले जाणारे क्रीडा साहित्य, वाद्ये किंवा पाळीव प्राणी यांच्या वाहतुकीबाबत अनेकदा विमाततळावर गोंधळाची स्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी विमान कंपन्यांनी आता आपल्या धोरणांमध्ये पारदर्शकता आणण्याचे निर्देश दिले आहेत. पाळीव प्राण्यांच्या प्रवासाबाबतची नियमावली स्पष्ट असावी आणि सामानाबाबतचे नियम प्रवाशांना सहज समजतील अशा भाषेत प्रसिद्ध करावेत, असेही सरकारने म्हटले आहे.

प्रवाशांच्या हक्कांची माहिती प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार-
विमान प्रवासात होणारा विलंब, अचानक रद्द होणारी उड्डाणे किंवा बोर्डिंग नाकारले जाणे अशा परिस्थितीत प्रवाशांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई आणि हक्कांची माहिती आता अधिक व्यापक करण्यात आली आहे. एअरलाईन्सनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर, मोबाईल ॲपवर आणि विमानतळावरील काउंटरवर ही माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या