Home / देश-विदेश / Ahmedabad plane crash| अपघातानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची पार्टी; ४ जण निलंबित

Ahmedabad plane crash| अपघातानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची पार्टी; ४ जण निलंबित

अहमदाबाद – एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघाताला(Ahmedabad plane crash) अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच एअर इंडियाच्या (Air...

By: Team Navakal
AISATS has expressed regret over a viral office celebration


अहमदाबाद – एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघाताला(Ahmedabad plane crash) अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच एअर इंडियाच्या (Air India) कर्मचाऱ्यांचा जल्लोशात पार्टी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला.असंवेदनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या या व्हिडिओची गंभीर दखल घेत एअर इंडियासाठी काम करणाऱ्या एआयसॅट कंपनीने पार्टीचे आयोजन करणाऱ्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.

१२ जून रोजी एअर इंडियाच्या ए-१७१ बोईंग ड्रिमलायनर हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले. या अपघातात विमानातील आणि जमिनीवरील असे मिळून २६० जणांचा बळी गेला. विमान कोसळल्यानंतर उडालेल्या इंधन तेलाच्या भडक्यात होरपळून मरण पावलेल्या प्रवाशांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. डिएनए चाचणीच्या साह्याने मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुमारे दहा-बारा दिवस सुरू होते. या परिस्थितीत एअर इंडियासाठी विमानतळावरील व्यवस्थापन सांभाळणाऱ्या एआयसॅट या कंपनीचे कर्मचारी कार्यालयात नाच-गाणे करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.त्यावरून एआयसॅटवर टीकेची झोड उठली होती. आता कंपनीने याप्रकरणी कठोर भूमिका घेत चार अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या