Home / देश-विदेश / Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांच्या अपघाताने जुन्या जखमा ताज्या; विमान अपघातात आतापर्यंत ‘या’ दिग्गजांनी गमावले प्राण

Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांच्या अपघाताने जुन्या जखमा ताज्या; विमान अपघातात आतापर्यंत ‘या’ दिग्गजांनी गमावले प्राण

Ajit Pawar Plane Accident : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे झालेला भीषण अपघात ही राज्यासाठी अत्यंत धक्कादायक...

By: Team Navakal
Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांच्या अपघाताने जुन्या जखमा ताज्या; विमान अपघातात आतापर्यंत 'या' दिग्गजांनी गमावले प्राण
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar Plane Accident : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे झालेला भीषण अपघात ही राज्यासाठी अत्यंत धक्कादायक घटना आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला निवडणूक सभांसाठी जात असताना हा अपघात झाला.

बारामती विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टी सोडून जवळच असलेल्या एका शेतात कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या दुर्घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा एकदा व्हीव्हीआयपी प्रवासाच्या सुरक्षिततेकडे गेले आहे.

भारताच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक दिग्गज नेत्यांचा अशाच प्रकारे विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.

विमान अपघातात प्राण गमावलेले देशातील मोठे नेते:

संजय गांधी (1980): २३ जून १९८० रोजी नवी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ स्वतः विमान उडवत असताना त्यांचे विमान कोसळले. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

माधवराव सिंधिया (2001): काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया ३० सप्टेंबर २००१ रोजी रॅलीसाठी कानपूरला जात असताना त्यांचे खाजगी विमान कोसळले. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे झालेल्या या दुर्घटनेत त्यांनी प्राण गमावले.

जी.एम.सी. बालैयोगी (2002): माजी लोकसभाध्यक्ष आणि तेलुगु देशम पक्षाचे नेते यांचे ३ मार्च २००२ रोजी आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

सायप्रियन सांगमा (2004): मेघालयचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन सांगमा यांचे २२ सप्टेंबर २००४ रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले.

ओम प्रकाश जिंदल (2005): प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे माजी मंत्री ओ.पी. जिंदल यांचा ३१ मार्च २००५ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.

वाय. एस. राजशेखर रेड्डी (2009): आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर नल्लामालाच्या घनदाट जंगलात कोसळले होते. २४ तासांच्या मोठ्या शोध मोहिमेनंतर त्यांचे पार्थिव सापडले होते.

दोरजे खांडू (2011): अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजे खांडू यांचे ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

जनरल बिपीन रावत (2021): देशाचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता.

विजय रुपाणी (2025): गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा १२ जून २०२५ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या