Akash Prime Missile | भारतीय सैन्याने (Indian Army) लडाख सेक्टरमध्ये 15,000 फुटांहून अधिक उंचीवर स्वदेशी ‘आकाश प्राइम’ (Akash Prime Missile) हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओसाठी (DRDO) हे मोठे यश मानले जात आहे.
ही चाचणी भारताच्या हवाई संरक्षणाला नवा आयाम देईल. या प्रणालीने अत्यंत वेगवान लक्ष्यांना भेदून दाखवलं, ज्यामुळे सैन्याच्या ताकदीत मोठी भर पडली आहे, संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
आकाश प्राइमचं सामर्थ्य
ही चाचणी लष्कराच्या हवाई संरक्षण दलाने आणि डीआरडीओच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पार पडली. ‘आकाश प्राइम’ने उंचीवर आणि विरळ हवेत वेगाने जाणाऱ्या विमानांवर अचूक निशाणा साधला. आता ही प्रणाली सैन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेजिमेंटमध्ये लवकरच दाखल होईल, असं सांगितलं जातंय.
विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान या प्रणालीने पाकिस्तानच्या चिनी विमानांविरुद्ध आणि तुर्की ड्रोन्सना चोख प्रत्युत्तर दिलं होतं, ज्यामुळे तिची प्रभावी कामगिरी समोर आली.
INTEGRATED FIRING AT HIGH ALTITUDE: TECH INFUSION
— @firefurycorps_IA (@firefurycorps) July 16, 2025
In pursuance of the #IndianArmy’s Decade of Transformation, Fire and Fury Corps conducted an Integrated Firing Exercise in Ladakh aimed at enhancing jointness and validation of Tactics, Techniques and Procedures incorporating… pic.twitter.com/a3x3FyflX9
दरम्यान, लडाखमधील ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ने एकात्मिक फायरिंग सरावही केला. यात नव्या पिढीच्या उपकरणांचा वापर करून रणनीती आणि तंत्रांचा अभ्यास करण्यात आला. कॉर्प्सने ‘एक्स’वर लिहिलं की, “भारतीय सैन्याच्या परिवर्तनाच्या दशकात हा सराव नव्या तंत्रज्ञानाला बळ देईल.”
हे देखील वाचा –