Home / देश-विदेश / Albania AI Minister: जगभरातील पहिला AI मंत्री चक्क ‘गरोदर’! थेट पंतप्रधानांनी केली घोषणा

Albania AI Minister: जगभरातील पहिला AI मंत्री चक्क ‘गरोदर’! थेट पंतप्रधानांनी केली घोषणा

Albania AI Minister: अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी एडि रामा यांनी नुकतीच एक आश्चर्यकारक घोषणा केली आहे. अल्बेनियाचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित असलेला...

By: Team Navakal
Albania AI Minister

Albania AI Minister: अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी एडि रामा यांनी नुकतीच एक आश्चर्यकारक घोषणा केली आहे. अल्बेनियाचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित असलेला मंत्री ‘डिएला’ आता ‘गरोदर’ आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच, समाजवादी पक्षाच्या प्रत्येक खासदारासाठी 1 एआय सहायक तयार करण्याची योजना त्यांनी स्पष्ट केली आहे.

बर्लिन येथील ग्लोबल डायलॉगमध्ये बोलताना रामा म्हणाले, “आम्ही आज डिएलासोबत मोठा धोका पत्करला आणि आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे प्रथमच डिएला गरोदर आहे आणि 83 बालकांना जन्म देणार आहे.”

हे ‘बालक’ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून एआय सहायक असतील. हे सहायक संसदेत होणारी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करतील आणि खासदारांना त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या चर्चा किंवा घटनांची माहिती देतील.

एआय सहायक कसे काम करतील?

रामा यांनी सांगितले की, हे 83 सहायक खासदारांना मदत करतील. “उदाहरणार्थ, जर एखादा खासदार कॉफी पिण्यासाठी बाहेर गेला आणि परत यायला विसरला, तर हे बालक सांगेल की त्यांच्या गैरहजेरीत सभागृहात काय बोलले गेले आणि कोणावर पलटवार करायचा आहे.”

ही संपूर्ण यंत्रणा 2026 च्या अखेरीस पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “या बालकांना त्यांच्या आईचे ज्ञान असेल,” असेही ते म्हणाले.

डिएला: जगातील पहिली एआय मंत्री

‘सूर्य’ असा अर्थ असलेल्या ‘डिएला’ची नियुक्ती अल्बेनियामध्ये सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. सार्वजनिक खरेदी प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी डिएलाला मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

डिएला ही जगातील पहिली नॉन-ह्यूमन सरकारी मंत्री आहे. ती स्वतः कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली एक ‘एआय संस्था’ आहे, जी केवळ कोड आणि पिक्सेल्सनी बनलेली आहे. जानेवारीमध्ये ‘ई-अल्बेनिया’ प्लॅटफॉर्मवर आभासी सहायक म्हणून तिने काम सुरू केले होते. तिला सार्वजनिक निविदांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून ते 100 टक्के भ्रष्टाचारमुक्त होतील.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या