Home / देश-विदेश / Sonam Wangchuck: वांगचूक यांच्यावरील आरोप खोटे पत्नी गीतांजली आंगमो यांचा आरोप

Sonam Wangchuck: वांगचूक यांच्यावरील आरोप खोटे पत्नी गीतांजली आंगमो यांचा आरोप

Sonam Wangchuck – तुरुंगात असलेले लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuck) यांच्या पत्नी गीतांजली आंगमो (Gitanjali Angmo) यांनी पती...

By: Team Navakal
Sonam Wangchuck

Sonam Wangchuck – तुरुंगात असलेले लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuck) यांच्या पत्नी गीतांजली आंगमो (Gitanjali Angmo) यांनी पती विरोधातील आरोप फेटाळले आहेत.आंदोलकांकडून वांगचूक यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी केली जात आहे.

गीतांजली आंगमो म्हणाल्या की, लडाखमध्ये सर्व लोक सोनम वांगचुक यांचावरील आरोपांचा निषेध करत आहे. त्यांनी केलेले आरोप हे खोटे आणि हेतुपुरस्सर आहेत. २४ सप्टेंबर रोजी जे काही घडलेल्या घटनेला वांगचूक जबाबदार कसे असू शकतात? याशिवाय संरक्षण मंत्र्याच्या आदेशावरून कोणताही पुरावा नसताना सोनम वांगचुक यांना अटक केल्याचा पोलीस महासंचालक डॉ. एस. डी. सिंग यांच्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ फेक असल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यामध्ये डिजिटल पद्धतीने फेरफार (डिजिटली ऑल्टर्ड)केली आहे. सिंग अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नाही.

आंदोलनात कारगिल वीराचा मृत्यू

लडाखमध्ये २४ सप्टेंबर रोजी सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात माजी सैनिक त्सेवांग थारचिन यांचा सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ४६ वर्षीय थारचिन हे कारगिल युद्धातील वीर होते आणि लडाख स्काऊट्समध्ये २१ वर्षे सेवेत होते. थारचिन यांच्या वडिलांनी म्हटले की, पाकिस्तान त्याला मारू शकला नाही, पण आपल्याच सैन्याने त्याचा जीव घेतला.

Web Title:
संबंधित बातम्या