Amit Thackeray : मनसे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांचे भाऊ डॉ. राहुल बोरडे यांचा विवाहसोहळा दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. या शाही सोहळ्याला अनेक राजकीय मान्यवरांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष उपस्थिती लावली. या विवाहसोहळ्यात राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. दिल्लीमध्ये या दोघांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचे डॉ. राहुल बोरडे यांचा शाही विवाहसोहळा आज दिल्लीत पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय मंडळीनी हजेरी लावली होती. तसेच या शाही विवाह सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थिती लावली होते. अमित ठाकरे आणि मोदींचा फोटो देखील सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांना शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेजवर देखील गेले होते. पंतप्रधान स्टेजवर गेले असताना स्टेजवर फोटोसेशन सुरू होते. त्याचवेळी खालून अमित ठाकरे हे त्यांचा मुलगा किआना ठाकरे याला सोबत घेऊन स्टेजवर गेले. अमित ठाकरे पंतप्रधानांच्या जवळ जाताच त्यांनी किआन ठाकरे याचे प्रेमाने गाल ओढले. दिल्लीतील विवाह समारंभाला पंतप्रधानांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.
या विवाहसोहळ्यात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी एकत्रित फोटोसेशन केले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भेटीनंतर युतीवर परिणाम होऊन युती तुटणार का चर्चा रंगल्या आहेत.
हे देखील वाचा – Aryan Khan : आर्यन खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात









