‘गुरुदक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीर पाहिजे’, जगद्गुरु रामभद्राचार्यांची लष्कर प्रमुखांकडे मागणी

Upendra Dwivedi visited Jagadguru Rambhadracharya

Upendra Dwivedi visited Jagadguru Rambhadracharya | लष्करप्रमुख (Chief of Army Staff) जनरल उपेंद्र द्विवेदी (General Upendra Dwivedi) यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे जगद्गुरु रामभद्राचार्य (Jagadguru Rambhadracharya) यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी लष्करप्रमुखांनी राम मंत्राची दीक्षा घेतली. या भेटीत जगद्गुरूंनी थेट पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणण्याची गुरुदक्षिणाम्हणून मागणी केली.

या भेटीत जगद्गुरूंनी सांगितले की, त्यांना त्याच राममंत्राची दीक्षा देण्यात आली आहे, जो मंत्र प्रभू हनुमानाला सीता मातेला वाचवण्यासाठी लंकेला प्रस्थान करण्याआधी देण्यात आला होता. यावेळी लष्करप्रमुख आणि जगद्गुरु यांच्यात आध्यात्मिक संवाद झाला आणि त्यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, मी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून दक्षिणेत पीओके मागितले आहे. लष्करप्रमुखांचा सन्मान करताना मला अभिमान वाटला.

जगद्गुरूंची ही मागणी, भारत सरकारने 7 मे रोजी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या(Operation Sindoor) पार्श्वभूमीवर विशेष ठरते. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारताने या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ नष्ट केले होते. 4 दिवस चाललेल्या प्रतिकारानंतर 10 मे रोजी युद्धविराम जाहीर झाला असला तरी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच आहे, असं संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जगद्गुरु रामभद्राचार्य हे प्रख्यात हिंदू आध्यात्मिक गुरु असून ते संस्कृत विद्वान आणि अनेक धार्मिक ग्रंथांचे लेखक आहेत.