Uttarkashi Flood : उत्तरकाशीत पाच लाखांची घोषणा ५,००० दिले ! नागरिकांचा संताप

flash flood forms lake in Uttarakhand Harsil


डेहराडून – उत्तरकाशीत (Uttarkashi) ढगफुटीमुळे आलेल्या प्रलयानंतर प्रचंड मोठे नुकसान झाले होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी (Pushkar Singh Dhami) यांनी पूरग्रस्तांना पाच लाखाची मदत जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना केवळ ५ हजारच (₹5,000. The victims returned)दिले. पूरग्रस्तांनी सरकारचा निषेध करत हे चेक परत (Relief Cheques) दिले आहेत. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ही मदत म्हणजे थट्टा असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.


उत्तरकाशीत ५ ऑगस्ट रोजी ढगफुटी झाली. त्यामध्ये धराली, हर्षल (Dharali and Harshil villages ) व उत्तरकाशीत मोठे नुकसान झाले. या गावातील ज्यांची घरे पूर्णपणे उद्धवस्त झालेली आहेत किंवा ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत झाली त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हातावर केवळ ५ हजार रुपयांचे चेक दिले. लोकांनी नाराजी व्यक्त करत ते घेण्यास नकार दिला.

त्यावर आता प्रशासनाने (administration)म्हटले की, ही केवळ अंतरिम मदत असून नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर संपूर्ण रक्कम देण्यात येईल. उत्तरकाशी भागात आज पाचव्या दिवशीही मदतकार्य सुरुच ठेवण्यात आले. काही भागात हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे टाकण्यात आली. तर काहींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. धराली बाजार भागातील ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. या भागात अनेक हॉटेल, वसतीगृहे, दुकाने व होमस्टे जमीनदोस्त झालेले आहेत. या ढगफुटीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण बेपत्ता (49 people still missing)झाले आहेत. आतापर्यंत एक हजार लोकांना वाचवण्यात यश आले आहे.