Home / देश-विदेश / Ayodhya Ram Temple : राम मंदिराचे काम पूर्ण झाले; मोदी धर्मध्वज फडवकणार

Ayodhya Ram Temple : राम मंदिराचे काम पूर्ण झाले; मोदी धर्मध्वज फडवकणार

Ayodhya Ram Temple -अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज (Dharma Dhwaj) फडकवण्यात येणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान...

By: Team Navakal
Ayodhya Ram Temple

Ayodhya Ram Temple -अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज (Dharma Dhwaj) फडकवण्यात येणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर रोजी हा ध्वज फडवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat)या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या ध्वजाची लांबी २२ फूट (22 feet) तर रुंदी ११ फूट आहे. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक म्हणून तो फडकावला जाणार आहे. तो फडकवण्याचा सोहळा प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha)सोहळ्याइतकाच भव्य असेल. याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी (Govind Dev Giri) म्हणाले की, या ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाचे प्रतीक आहेत, तो हा भगव्या रंगाचा ध्वज राम मंदिराच्या १६१ फूट उंच कळसावर लावलेल्या ४२ फूट उंच खांबावर फडकवला जाईल. ही पाच दिवसांचा सोहळा २१ नोव्हेंबर पासून सुरू होईल आणि २५ नोव्हेंबरला ध्वजारोहणानंतर समाप्त होईल.

या कार्यक्रमाला आधी ८,००० पाहुण्यांना निमंत्रित केले जाणार होते. परंतु आता मंदिर ट्रस्टने पाहुण्यांची संख्या वरून १०,००० पर्यंत वाढवली आहे. राम मंदिरासह परिसरातील सहा अन्य मंदिरे आणि शेषावतार मंदिरावरही ध्वजारोहण केले जाईल. यात भगवान शिव, गणेश, सूर्य, हनुमान (Hanuman), माता भगवती आणि माता अन्नपूर्णा (Goddess Annapurna)यांच्या मंदिरांचा समावेश आहे. सोहळ्यादरम्यान सर्व ८ मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा, हवन आणि अन्य विधी पार पडतील.


हे देखील वाचा –

एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक

विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..

रेल्वेत सरकारी नोकरीची संधी अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

Web Title:
संबंधित बातम्या