Babri Masjid : बाबरी मशीद म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो फक्त वाद. आणि आता त्यात तहरीक मुस्लिम शब्बनने ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक आणि कल्याण संस्था (वेलफेअर इन्स्टिट्यूशन) उभारण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. मशीद पाडल्याच्या ३३ व्या वर्षपूर्तीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक मलिक म्हणाले की, हे कसे आणि किती वेळात बांधले जाईल, या बद्दलची घोषणा आम्ही लवकरच करू.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबाद येथे बाबरीसारख्या मशिदीची पायाभरणी केली. त्यानंतर आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक आणि वेलफेअर इन्स्टिट्यूशन उभारण्याची घोषणा तहरीक मुस्लिम शब्बनने केली आहे.
तहरीक मुस्लिम शब्बनच्या अध्यक्षांनी आरोप केला की, जर आपण तुळशीदासांची रामायण पाहिली, तर ती बाबरी मशीद बांधल्यानंतर ६० वर्षांनी लिहिली गेली होती. त्या रामायणात राम मंदिर पडले गेले होते. परंतु याचा कोणताही उल्लेख नाही.
ते म्हणाले – बाबराच्या नंतर हुमायूंचे राज्य आले आणि मग त्यानंतर अकबराचे राज्य आले. अकबराच्या महालात देखील विधी आणि प्रार्थना होत असत. जोधाबाई देखील अकबराच्या महालात होत्या. त्यावेळी तुलसीदास देखील जिवंत होते. मानसिंह हे त्यावेळी लष्करप्रमुख होते. अश्या गोष्टी मात्र तुलसीदासांच्या रामायणात येत नाही.
मुश्ताक मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित वादांवर बोलताना इतिहास आणि धर्माच्या नावावर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणावर टीका केली. ते म्हणाले की, बाबरच्या नावामुळे कोणालाही त्रास होऊ नये, परंतु या विषयाचा राजकीय प्रचारासाठी सातत्याने वापर केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला. देशात विभाजनाची भावना वाढवण्यासाठी आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन व दलित यांच्यातील बंधुत्वाला तडा देण्यासाठी मुद्दाम या विषयाला हवा देण्यात आला.
हुमायूं कबीर, ज्यांनी बाबरीसारख्या मशिदीची पायाभरणी केली होती. त्यांनी या बद्दल सांगितले कि – आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही बाबरी मशीद बांधू शकत नाही. असे कुठेही लिहिले गेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने याआधी एक निर्णय दिला होता ज्यात म्हटले होते की हिंदू लोकांनी बाबरी मशीद पाडली होती. हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन, इथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु संविधान मात्र आम्हाला मशीद बांधण्याची परवानगी देते.”
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली. त्यानंतर मात्र तृणमूल काँग्रेसचे (TMC) निलंबित आमदार हुमायूं कबीर यांच्यावर तीव्र हल्ला केला. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी सरकार राजकीय फायद्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अकबर आणि मानसिंह यांच्याशी तुलसीदासांचा संपर्क असताना देखील त्यांनी मंदिर पाडल्याचा उल्लेख केला नाही, यावरून हा मुद्दा राजकीय हेतूने पुढे रेटला आहे.
हे देखील वाचा – Girish Mahajan : नाशिकसाठी महाजनांची झाडे खरेदी; झाड खरेदीसाठी गिरीश महाजन पोहोचले राजमुद्रीत









