Bengaluru Murder : बेंगळुरू (Bengaluru) पोलिसांनी २९ वर्षीय त्वचारोगतज्ज्ञाच्या पतीला तिच्या मृत्यूच्या सुमारे सहा महिन्यांनंतर हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या (Police) माहितीनुसार व्हिक्टोरिया हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय गॅस्ट्रो-सर्जन डॉ. महेंद्र रेड्डीला पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. कृतिकाचे वडील के. मुनिरेड्डी यांच्या तक्रारीवरून मराठहल्ली पोलिसांनी या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनी सांगितले की, व्हिसेरा अहवालात असे दिसून आले आहे की त्यांच्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक वाटावा यासाठी तिला प्रोपोफोल (Propofol overdose death) या भूल देणाऱ्या औषधाचा अतिरिक्त वापर करण्यात आला आहे.
डॉक्टर जोडपे बेंगळुरूच्या गुंजूर येथे राहणारे. २१ एप्रिल रोजी कृतिकाने पोटदुखीची तक्रार केली होती, त्यानंतर महेंद्रने औषध इंजेक्शन देण्यासाठी तिच्या उजव्या पायात कॅन्युला नावाचं औषध घातलं. दुसऱ्या दिवशी, कामावर जाण्यापूर्वी महेंद्रने कृतिकाला तिच्या माहेरी पालकांच्या घरी सोडले. दुसऱ्या दिवशी, कृतिकाने तिच्या पायात वेदना होत असल्याची तक्रार केली आणि महेंद्रला संदेश पाठवला कि कॅन्युला काढता येईल का असे विचारले. त्याने त्यावर नकार दिला आणि म्हटले की दुसरा डोस घेतल्याने वेदना परत येणार नाहीत. त्या रात्री, कृतिका तिच्या पालकांसोबत जेवणानंतर नेहमीप्रमाणेच तिच्या खोलीत गेली. मिळालेल्या माहिती नुसार महेंद्रने तिला शेवटचा डोस दिला. २४ एप्रिल रोजी सकाळी साडे सात वाजता, महेंद्रने त्याच्या सासूला फोन करून सांगितले की कृतिका हालचाल करत नाही आहे. तिचे वडील आले त्यांना तिची हालचाल जाणवली नाही ती कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद देत न्हवती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे तिला मृत घोषित केले.
यानंतर कृतिकाच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की महेंद्रने मृत्यू तपास प्रक्रियेत व्यत्यय आणला. त्याने शवविच्छेदन कक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला तिथेच अडवले. एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, त्यांना हे अत्यंत असामान्य वाटले आणि त्यांनी फॉरेन्सिक तपासणी आणि विश्लेषणाचा आग्रह देखील धरला. एका वृत्तानुसार, महेंद्र वारंवार खून आणि गुन्ह्यावर आधारित टीव्ही मालिका आणि चित्रपट पाहत असे. त्यानंतर त्याचे वर्तन अचानक बदलले.
प्रोपोफोल हे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा बेशुद्धावस्थेदरम्यान वापरले जाणारे एक अंतःस्रावी भूल देणारे असे औषध. हे डोस सामान्यतः शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम १ ते २.५ मिलीग्राम इतका असतो आणि बेशुद्धी टिकवून ठेवण्यासाठी, प्रति किलोग्रॅम ५०-२०० मायक्रोग्रॅम असतो. अतिसेवनामुळे रक्तदाब आणि हृदय गती कमी होऊ शकते, त्यामुळे मृत्यूची शक्यता अधिक वाढते.
हे देखील वाचा – Rahul Gandhi : बिहारमधील जागावाटपाचा गतिरोध सुटणार का? राहुल गांधींचा थेट लालू यादव यांना फोन..