Home / देश-विदेश / बंगळुरू रॅपिडो प्रकरण: ‘आधी तिने मारले’, महिलेला कानाखाली मारणाऱ्या चालकाचा दावा, नवीन व्हिडिओ आला समोर

बंगळुरू रॅपिडो प्रकरण: ‘आधी तिने मारले’, महिलेला कानाखाली मारणाऱ्या चालकाचा दावा, नवीन व्हिडिओ आला समोर

Rapido Driver Slaps Woman in Bengaluru | बंगळुरूमध्ये एका रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने महिलेला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

By: Team Navakal
Rapido Driver Slaps Woman in Bengaluru

Rapido Driver Slaps Woman in Bengaluru | बंगळुरूमध्ये एका रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने महिलेला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे.

याआधी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रॅपिडो चालकाने महिलेला मारल्याचे दिसत होते. मात्र, आणखी एका व्हिडिओमध्ये महिला रॅपिडो चालकाशी वाद घालत असल्याचे व त्याला मारत असल्याचे दिसत आहे. चालकाचे नाव सुहास असून, त्याने दावा केला आहे की, महिलेने प्रथम त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली, त्यानंतरच त्याने प्रत्युत्तर दिले.

बंगळुरूच्या जयनगर परिसरात ही घटना घडली. सुहासने सांगितले की, महिलेने रॅपिडो बुक केल्यानंतर तिने त्याला तातडीने थांबायला सांगितले. मात्र, त्या ठिकाणी थांबणे शक्य नसल्याचे सांगताच तिने अपमानास्पद भाषेत शिवीगाळ सुरू केली आणि मारले” मी तिला सांगितले की त्या जागी थांबता येणार नाही, तेव्हा तिने मला मारहाण केली. त्यानंतरच मी प्रत्युत्तर दिले,” असे सुहासनेसांगितले. त्याने याप्रकरणी जयनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर बेंगळुरू पोलिसांनी तातडीने कारवाई केली. शहर पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंग यांनी सांगितले की, ही घटना सुरुवातीला पोलिसांना कळवली गेली नव्हती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला आणि तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले. “आम्ही चालकाला ताब्यात घेतले आहे आणि तपास सुरू आहे. या प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल,” असे आयुक्त सिंग म्हणाले.

उपायुक्त (दक्षिण बेंगळुरू) लोकेश बी. जगलासर यांनी सांगितले की, असुरक्षित ड्रायव्हिंगच्या तक्रारीमुळे हा वाद सुरू झाला. “महिलेने चालकाच्या ड्रायव्हिंगवर आक्षेप घेतला, ज्यामुळे वाद वाढला आणि मारामारी झाली. सुरुवातीला महिलेने एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता, पण आता ती पुढे आली आहे,” असे जगलासर म्हणाले.

नवीन फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या फुटेजमध्ये महिलेने प्रथम चालकावर हल्ला केल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, अनेकांनी रॅपिडोच्या सुरक्षितता धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या