Home / देश-विदेश / Bharat Bandh: उद्या ‘भारत बंद’! 25 कोटींहून अधिक कर्मचारी संपावर, कोणत्या सेवा सुरू-कोणत्या बंद? जाणून घ्या

Bharat Bandh: उद्या ‘भारत बंद’! 25 कोटींहून अधिक कर्मचारी संपावर, कोणत्या सेवा सुरू-कोणत्या बंद? जाणून घ्या

Bharat Bandh on 9 July | उद्या (9 जुलै) देशभरातील 25 कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी संपावर (Bharat Bandh on 9...

By: Team Navakal
Bharat Bandh

Bharat Bandh on 9 July | उद्या (9 जुलै) देशभरातील 25 कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी संपावर (Bharat Bandh on 9 July) जात आहे. देशभरात उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बँकिंग, टपाल सेवा, खाणकाम, बांधकाम आणि परिवहन क्षेत्रात ‘भारत बंद’च्या आवाहनासह देशव्यापी संपावर जात आहेत.

10 केंद्रीय ट्रेड युनियन्स आणि शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या मजूर आणि शेतकरी-विरोधी धोरणांविरुद्ध हा संप पुकारला आहे. या बंदमुळे सार्वजनिक सेवांमध्ये मोठा व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम वाहतूक, बँकिंग आणि दैनंदिन कामकाजावर होईल. मात्र, शाळा आणि खाजगी कार्यालये खुली राहतील.

‘भारत बंद’चे कारण

केंद्रीय ट्रेड युनियन्सच्या संयुक्त मंचाने सरकारच्या “कॉर्पोरेट-समर्थक” धोरणांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, नवीन श्रम संहिता, वाढती बेरोजगारी, महागाई, आणि आरोग्य, शिक्षणातील कपात यामुळे कामगारांचे हक्क आणि नोकरीच्या परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. सरकारने 10 वर्षांत श्रम संमेलन आयोजित न केल्याचा आणि स्थलांतरित मजुरांना वंचित ठेवल्याचा आरोपही युनियन्सनी केला आहे.

मागण्या आणि सहभागी संघटना

संपामागील 17 कलमी मागणीपत्रात चार नवीन श्रम संहिता रद्द करणे, कामाचे तास कमी करणे, कंत्राटीकरण थांबवणे आणि वेतन सुधारणा यांचा समावेश आहे. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC), भारतीय ट्रेड युनियन्सचे केंद्र (CITU), हिंद मजदूर सभा (HMS), स्व-नियोजित महिला संघ (SEWA) यांसह संयुक्त किसान मोर्चा, रेल्वे, NMDC आणि स्टील उद्योगातील कर्मचारी संपात सहभागी होत आहेत.

बंदचा परिणाम

संपामुळे बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, परिवहन आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर परिणाम होईल. रेल्वे सेवांवर थेट परिणाम नसला, तरी रेल्वेंना उशीर होण्याची शक्यता आहे. बाजारपेठा आणि दुकानांवरही परिणाम अपेक्षित आहे, परंतु आपत्कालीन आणि आरोग्य सेवा खुल्या राहतील. शाळा आणि खाजगी कार्यालये खुली राहतील. शेतकरी आणि ग्रामीण मजूरही या आंदोलनात सामील होत असल्याने बंदचा प्रभाव तीव्र होईल.

Web Title:
संबंधित बातम्या