Bihar Assembly Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर महाआघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सत्ताधारी आगाडीने अधिक उत्तम कामगिरी बजावली. यावेळी २४३ पैकी २०० हुन जास्त जागा जिंकत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र विरोधकांना मात्र या निवडणुकीत ४० संख्ये पर्यंत देखील पोहोचता आले नाही. राष्ट्रीय जनता दल पक्षाला मिळालेली बहुमत तसेच महाआघाडीचा पराभव या निवडकीचे गांभीर्य दर्शवतो. त्यातील काही प्रमुख मुद्दे जे आपले लक्ष वेधून घेतात.
या निवणुकीत भारतीय जनता पार्टीने ११० उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यापैकी ९१ उमेदवाराणी आघाडी सोडली नाही. याचा अर्थ भाजपाला ८२.७२ टक्के यश मिळालं आहे. एनडीए २०० हून अधिक जगांवर भूतो न भविष्यती अशी आघाडी मिळवली आहे.
देशातील अनेक पक्षांना आजवर निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यात सहाय्यता करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यावेळी स्वतःचा पक्ष निवडणुकीत उतरवला होता. परंतु, त्यांना या निवडणुकीत यश मिळालं नाही. त्यांनी २३८ जागा लढवल्या होत्या. परंतु, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा मात्र चांगलाच पराभव झाला आहे. राजदला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राजदला १ कोटी १० लाख ६३ हजार मतं मिळाली आहेत. संयुक्त जनता दलाला ९२ लाख ८४ हजार, भाजपाला ९७ लाख ५५ हजार, काँग्रेसला ४२ लाख ३५ हजार, लोकजनशक्ती पार्टीला २४ लाख ३९ हजार अशी मतं मिळाली आहेत.
या निवडणुकीत एमआयएमने एनडीए किंवा महाआघाडीबरोबर युती करण्यास पसंती दिली नाही. स्वबळाची नारा देत निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमने अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतं मिळवली त्यांनी जवळजवळ पाच मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवली आहे.
हे देखील वाचा –
Airless Tyres : पंक्चर आणि हवेचं टेन्शन संपलं! एअरलेस टायर्स नेमके कसे काम करतात? जाणून घ्या









