Home / देश-विदेश / Bihar Assembly Elections 2025 : अखेर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला..बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच पाठबळ तेजस्वी यादवांच्यामागे!

Bihar Assembly Elections 2025 : अखेर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला..बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच पाठबळ तेजस्वी यादवांच्यामागे!

Bihar Assembly Elections 2025 : राज्य कोणताही असो सगळ्यात जास्त चर्चा होते ती राजकारणाची. बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्याआधी...

By: Team Navakal
Bihar Assembly Elections 2025

Bihar Assembly Elections 2025 : राज्य कोणताही असो सगळ्यात जास्त चर्चा होते ती राजकारणाची. बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्याआधी जागावाटपावरून चालू असलेला वाद आणि अंतर्गत संघर्ष कोणापासूनच लपला नाही. त्यानंतर ‘महागठबंधन’वर देखील बरच टीकास्त्र झालं. दरम्यान, महागठबंधनच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्व मतभेद दूर झाल्याचं देखील जाहीर केलं.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी या पत्रकार परिषदेत महागठबंधनचा प्रमुख चेहरा जाहीर केला आहे. ते म्हणतात,या वेळी “तेजस्वी यादव हे महागठबंधनचा निवडणुकीचा चेहरा असतील. आम्ही तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहोत.” असे अधिकृतरित्या त्यांनी स्पष्ट केले.

“देशाची स्थिती गंभीर असल्याचं देखील ते म्हणाले. लोक चिंतेत आहेत. देश कुठल्या दिशेने जातोय आणि कुठल्या दिशेने जाणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. देशाला योग्य मार्गावर आणणं आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. बिहारच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. बेरोजगारी असो किंवा इतर मुद्दे, सगळ्याच बाबतीत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे. विद्यार्थी, युवक, शेतकरी हे सगळेच चिंतेत आहेत. लोकांना आता बदल हवा आहे.” असे देखील ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम म्हणाले, “अनेक महिन्यांपासून या संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठका चालू होत्या. माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दाखवल्या. परंतु, इतकंच सांगू इच्छितो की महागठबंधन एकजुटीने निवडणुकीत उभं आहे. आजचा दिवस स्वप्न सत्यात उतरवणारा ठरणार आहे. आम्ही सगळे मिळून संपूर्ण ताकदीने पुढे जाऊ.”असं ते म्हणाले.

विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यावेळी म्हणाले, “गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही आजच्या दिवसाची वाट पाहत होतो. भाजपाने जसे आमचे आमदार फोडले, गरीबांना रस्त्यावर आणलं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की भाजपाला तोडणार नाही तोवर सोडणार नाही असं वक्तव्य मुकेश साहनी यांनी केलं. महागठबंधन मजबूत आहे. आम्ही आगामी निवडणूक जिंकून राज्यात सरकार स्थापन करू.”असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे.

राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षतेखाली बिहारमध्ये काही विरोधी पक्षांनी एकत्र येत महागठबंधन तयार केलं आहे. यामध्ये काँग्रेससह दीपांकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय-एमएल तथा मार्क्सवादी-लेनिनवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम – मार्क्सवादी) आणि मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीचा देखील समावेश आहे.

हे देखील वाचा – 

Thackeray Bhaubeej : ठाकरे बंधू भाऊबीजेसाठी एकत्र..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या