Bihar Victory : भारतात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आज बिहारमध्ये मतमोजणी झाली. आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे देखील दिसून आले. आणि याचे श्रेय देखील मोदी आणि शहांना जाते. मागच्या काही काळापासून भारताच्या प्रत्यक कोपऱ्यात कुठे ना कुठे भाजपचा आवाज घुमताणा दिसत आहे. या निवडणुकी प्रक्रिये दरम्यान अनेक चर्चना फाटे फुटले. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आणि भाजपचे नेतृत्व प्रामुख्याने मोदी-शहा यांच्यातील सुप्त संघर्ष होत असल्याची चर्चा तर वाऱ्यासारखी पसरली. तस पाहायला गेलं तर बिहारमध्ये भाजपाला पूर्ण यश मिळाले तर मोदी आणि शहांच्या ऐकिला कोणीही तोंड देऊ शकणार नाही.
तस खोलवर पाहायला गेलं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नियुक्ती कित्येक महिने रखडली आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा मोदी सरकारमध्ये मंत्री झाले असून त्यांची अध्यक्षपदाची वाढीव मुदतही आता संपलेली. ही नियुक्ती सातत्याने लांबणीवर पडताना दिसत आहे. आणि यामुळे मोदी-शहा आणि संघ यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
गेले कित्येक काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सरकारी कारभार व सरकारी यंत्रणा या दोन्हींवर चांगलीच मजबूत पकड असल्याचे देखील दिसून आले. पण शहांनची भाजपच्या संघटनेवरील पकड सुटली आहे का? हा येणार काळ ठरवेल. आतापर्यंत तरी भाजपचे संघटनात्मक सर्व निर्णय शहाच घेतात ही बाब कोणापासूनही लपलेली नाही. पण मग तरीही पाणी मुरतंय कुठे हा प्रश्न आलाच.
पण चर्चेचा मुख्य मुद्दा असा आहे कि शहांनी पूर्णपणे सरकारमध्ये लक्ष द्यावे, संघटनेची जबाबदारी एका नव्या व्यक्तीकडे द्यावी असा हा मतभेदाचा मुद्दा होता. पण हा मतभेद अद्याप संपलेला नाही. या मतभेदातून नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नियुक्ती रखडल्याचे चित्र देखील समोर आहे. पण नवा अध्यक्ष कोण? कारण आता पर्यंत भाजपच्या कारकिर्दीत मोदी आणि शहा यांच्याहून अधिक मुरलेला चेहरा नाही त्यामुळे नवा अध्यक्ष नेमायचा असेल तर मोदी-शहा किंवा संघाचे नेतृत्व यापैकी कोणाला तरी तडजोडीची भूमिका हि घ्यावी लागेल हेही तितकेच खरे.
हे देखील वाचा – Zohran Mamdani New York Mayor: 34 वर्षीय डेमोक्रॅटिक-सोशलिस्टचा ऐतिहासिक विजय, भारतीय वंशाचा जोहरान ममदानी बनला न्यूयॉर्कचा पहिला मुस्लिम महापौर









