Home / देश-विदेश / बिल गेट्स यांचा मोठा निर्णय, संपूर्ण संपत्ती ‘या’ कामासाठी देणार

बिल गेट्स यांचा मोठा निर्णय, संपूर्ण संपत्ती ‘या’ कामासाठी देणार

Bill Gates Philanthropy | मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी आफ्रिकेतील (Africa) आरोग्य (health) आणि शिक्षण (education) सेवा...

By: Team Navakal
Bill Gates Philanthropy

Bill Gates Philanthropy | मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी आफ्रिकेतील (Africa) आरोग्य (health) आणि शिक्षण (education) सेवा सुधारण्यासाठी पुढील वीस वर्षांत त्यांची बहुतांश संपत्ती खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

आफ्रिकेतील प्रत्येक देशाने आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून समृद्धीच्या मार्गावर असावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याच वेळी त्यांनी आफ्रिकेतील युवा नवोदित उद्योजकांना कृत्रिम बुद्धिमत्तातंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा सल्ला दिला.

गेल्या महिन्यात बिल गेट्स यांनी घोषणा केली होती की, त्यांच्या संपत्तीपैकी 99% भाग दान केला जाईल, जो जवळपास $200 अब्ज इतका असू शकतो. त्यांच्या फाउंडेशनने 2045 पर्यंत आपले कार्य थांबवण्याची योजना आखली आहे.

आफ्रिकन युनियनच्या मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या दान केलेल्या संपत्तीचा मोठा भाग आफ्रिकेतील आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात येईल. त्यांच्या या घोषणेचे मोझांबिकच्या माजी फर्स्ट लेडी ग्राका माचेल (Graça Machel) यांनी स्वागत केले असून, ही मदत आफ्रिकेला सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

याचवेळी बिल गेट्स यांनी आफ्रिकेतील आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट केले की, गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर मातेला निरोगी राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे चांगले परिणाम मिळतात. मुलांना त्यांच्या पहिल्या चार वर्षांत योग्य पोषण मिळाल्यास त्यांच्या आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम होतो, असेही त्यांनी नमूद केले.

बिल गेट्स यांनी आफ्रिकेतील आरोग्य सुधारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दिशेने पुढे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मोबाईल फोनच्या (mobile phones) मदतीने आफ्रिकेतील बँकिंग क्षेत्रात झालेल्या क्रांतीचा उल्लेख केला आणि आता आरोग्य सेवेतही तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर केला जावा, असा सल्ला दिला.

गेल्या महिन्यात बिल गेट्स यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्या फाउंडेशनकडून दान करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, “मी मरण पावल्यावर लोक माझ्याबद्दल खूप काही बोलतील, पण ‘तो श्रीमंत मरण पावला’ हे त्यापैकी एक नसेल.” आता गेट्स यांनी पुन्हा एकदा त्यांची बहुतांश संपत्ती आफ्रिकेतील देशाने सुविधा करण्यासाठी वापरणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या