Home / देश-विदेश / Quick Commerce Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरीचा हट्ट आता संपणार? कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

Quick Commerce Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरीचा हट्ट आता संपणार? कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

Quick Commerce Delivery: ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत त्या घरापर्यंत पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ कंपन्या आता बॅकफूटवर आल्या...

By: Team Navakal
Quick Commerce Delivery
Social + WhatsApp CTA

Quick Commerce Delivery: ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत त्या घरापर्यंत पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ कंपन्या आता बॅकफूटवर आल्या आहेत. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी डिलिव्हरी बॉईजवर येणारा मानसिक आणि शारीरिक ताण तसेच त्यांच्या असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, ब्लिंकिट आणि झेप्टो सारख्या कंपन्यांनी स्वतःहून १० मिनिटांच्या डिलिव्हरीचे दावे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्लिंकिटने बदलली आपली ओळख

झोमॅटोच्या मालकीच्या ब्लिंकिटने आपल्या प्लॅटफॉर्मवरून ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’ हे घोषवाक्य गुपचूप हटवले आहे. कंपनीने आता “१० मिनिटांत १०,००० हून अधिक उत्पादने” याऐवजी “३०,००० हून अधिक उत्पादने तुमच्या दारापर्यंत” असे नवीन घोषवाक्य स्वीकारले आहे. डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी हा बदल केल्याचे समजते.

सरकारचा हस्तक्षेप आणि कामगारांचा संप

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने अलीकडेच या कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. यामध्ये अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या अट्टहासामुळे कामगारांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

विशेष म्हणजे, २०२५ च्या सुरुवातीलाच डिलिव्हरी बॉईजनी देशभरात संप पुकारला होता. रस्त्यावरील धोके, उत्पन्नाची अस्थिरता आणि वेळेचे बंधन यामुळे होणारा शारीरिक त्रास याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता.

डिपिंदर गोयल यांचे स्पष्टीकरण

या वादावर बोलताना झोमॅटो समूहाचे सीईओ डिपिंदर गोयल यांनी आपल्या मॉडेलचा बचाव केला आहे. ते म्हणाले की, “आम्ही रायडर्सना वेगाने गाडी चालवण्यास प्रोत्साहन देत नाही. आमचे स्टोअर्स ग्राहकांच्या घराच्या जवळ असल्याने डिलिव्हरी लवकर होते. डिलिव्हरी पार्टनर्सच्या ॲपवर ग्राहकांना दिसणारा टायमर दिसत नाही, त्यामुळे त्यांच्यावर थेट कोणताही दबाव नसतो.” मा

त्र, सरकारने या ब्रँडिंगमुळे कामगारांवर अप्रत्यक्ष दबाव येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

ब्लिंकिटने पाऊल उचलले असले तरी, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्ट सारख्या इतर कंपन्या अजूनही काही ठिकाणी १० मिनिटांचा दावा करताना दिसत आहेत. मात्र, सरकारी दबावामुळे येत्या काळात सर्वच कंपन्यांना आपल्या मार्केटिंग धोरणात बदल करावा लागण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या