Home / देश-विदेश / Bondi Beach Shooting : रायफल हिसकावून घेणारा धाडसी हिरो! दहशतवाद्याशी तो एकटा भिडला; पाहा थरारक व्हिडिओ

Bondi Beach Shooting : रायफल हिसकावून घेणारा धाडसी हिरो! दहशतवाद्याशी तो एकटा भिडला; पाहा थरारक व्हिडिओ

Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात 14 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगाला धक्का बसला आहे. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दोन...

By: Team Navakal
Bondi Beach Shooting
Social + WhatsApp CTA

Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात 14 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगाला धक्का बसला आहे. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दोन हल्लेखोरांनी हानुका उत्सव साजरा करणाऱ्या ज्यू समुदायाच्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सुमारे 29 लोक जखमी झाले आहेत.

मरण पावलेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसऱ्या संशयिताची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, एका हल्लेखोराची ओळख 24 वर्षीय नवीद अक्रम म्हणून पटली आहे.

या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक नागरिक एका हल्लेखोराला मोठ्या धैर्याने पकडताना दिसत आहे. या कृत्यामुळे पुढील रक्तपात टळला असावा, असा अंदाज आहे. या व्हिडिओमध्ये तो माणूस हल्लेखोराला पकडताना, त्याच्या हातून रायफल हिसकावून घेताना आणि आजूबाजूला गोंधळ माजलेला असताना तेच शस्त्र हल्लेखोरावर रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

गोळीबार आणि पळापळ करणाऱ्या जमावाच्या गोंधळात हा धाडसी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दुसरा हल्लेखोर उंच असलेल्या एका हँगिंग वॉकवेवर उभा राहून खालील लोकांवर गोळीबार करत असल्याचे दिसत आहे, तर समुद्रकिनाऱ्यावर जमलेले लोक भीतीने सैरावैरा पळत आहेत.

हानुका उत्सवावेळी घडली भीषण घटना; 16 लोकांचा मृत्यू

हा हल्ला हानुका उत्सवाच्या वेळी झाला. या हल्ल्यात किमान 16 लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नंतर पुष्टी केली की मृतांमध्ये एका हल्लेखोराचा समावेश आहे, तर दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, संध्याकाळी 6.40 वाजता दोन लोक कॅम्पबेल परेडवरील बॉन्डी पॅव्हेलियनजवळ एका वाहनातून बाहेर पडले आणि गोळीबार सुरू केला. घटनास्थळाच्या व्हिडिओमध्ये काळ्या कपड्यांमधील दोन लोक समुद्रकिनाऱ्याजवळ गोळीबार करताना दिसत होते. एका रिपोर्टनुसार, न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यात जवळपास 40 लोक जखमी झाले, तर या कारवाईदरम्यान दोन पोलिस अधिकारीदेखील गोळी लागून जखमी झाले.

पंतप्रधान म्हणाले ‘धक्कादायक आणि त्रासदायक’

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या सामूहिक गोळीबाराला “धक्कादायक आणि त्रासदायक” म्हटले आहे आणि पोलीस व आपत्कालीन प्रतिसाद पथके लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी काम करत असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा – Who is Nitin Nabin : अज्ञात नेतृत्वाचा उदय! भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेले नितीन नबीन कोण आहेत?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या