Home / देश-विदेश / गुजरातमध्ये आणखी एक पूल कोसळला

गुजरातमध्ये आणखी एक पूल कोसळला

अहमदाबाद – गुजरातमध्ये (Gujarat) आज आणखी एक पूल कोसळला. आज सकाळी जुनागढ जिल्ह्यात अजाक गावाजवळ दुरुस्तीदरम्यान पूलाचा स्लॅब(Bridge collapses) कोसळला...

By: Team Navakal
Bridge collapses in Gujarat

अहमदाबाद – गुजरातमध्ये (Gujarat) आज आणखी एक पूल कोसळला. आज सकाळी जुनागढ जिल्ह्यात अजाक गावाजवळ दुरुस्तीदरम्यान पूलाचा स्लॅब(Bridge collapses) कोसळला . स्लॅबसह एक हिताची मशीन आणि काही कामगार थेट खाली पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जुनागढच्या मंगरोळ तालुक्यातील अजाक गावाजवळ असलेला हा पूल केशोड ते माधवपूर मार्गावर आहे, ज्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. आज सकाळी दुरुस्ती सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आणि हिताची मशीन मोठ्या आवाजात खाली पडली. स्लॅबवर उभे असलेले काही कामगार थेट नदीपात्रात पडले, मात्र सुदैवाने कुणी गंभीर जखमी झाले नाही. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video viral) होत आहे.

गुजरातमध्ये आठवडाभरात पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ९ जुलै रोजी वडोदऱ्याजवळील गंभीरा पूल कोसळला होता. मुजपूर व अंकलाव जोडणारा हा पूल कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला होता, तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. मध्य गुजरात आणि सौराष्ट्राला जोडणारा हा पूल १९८६ मध्ये बांधण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनी अनेकदा दुरुस्ती किंवा नव्या पुलाच्या मागणी केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले असा आरोप आहे. सलग घडत असलेल्या या दुर्घटनांमुळे गुजरातमधील पुलांची सुरक्षितता आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या