Bus Accident : तामिळनाडूत दोन बसची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. हा अपघात तामिळनाडूतल्या कराईकुडी या ठिकाणी झाला आहे. या अपघातात एकूण ११ जण ठार झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेमध्ये ३० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या दोन बसेसची धडक इतकी भीषण होती की यामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या दोन बसेसची टक्कर कशी झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्यही राबवण्यात आले अशी माहिती देखील पोलिसांनी दिली.
या अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शी काय सांगतो पहा:
“बसचा अपघात हा समथवूपुरम या ठिकाणी झाला होता. या अपघातात दोन्ही बसेसची एकमेकांना टक्कर बसली. त्यामधील एक बस कनगयामची होती तर दुसरी बस कराईकुडीची होती. दोन्ही बस या सरकारी बस सेवेमधील आहेत. या अपघातात आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. आम्हाला काहींनी सांगितलं की एका महिला बसची वाट पहात स्टॉपवर उभी होती. त्याचवेळी समोरुन बस आली आणि या बसला धडक दिली ज्यात तिचा अपघात झाला.”
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या दोन्ही बसेसमध्ये मिळून एकूण ५५ प्रवासी बसले होते. या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेलं.
हे देखील वाचा – Election 2025 Postponed : राज्यातील तब्ब्ल २२ नगरपरिषदांच्या निवडणुका ढकलल्या पुढे; २० डिसेंबरला मतदान आणि बरच काही..









