Bus Fire : जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एसी बसला भीषण आग. आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर; १६ जण गंभीर जखमी आहेत. ही आग लागली कशी? याचा तपास सुरु आहे. फक्त ५ दिवस जुनी असणारी बस आगीच्या थारोळ्यात होती आणि क्षनार्धात होत्याच न्हवत झालं. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भर दिवाळीच्या तोंडावर हि घटना घडल्याने देशभरात आक्रोश व्यक्त केला जात आहे. २० जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता मृताच्या वारसांकडून विचारला जात आहे. आग इतकी भयंकर होती की मृतदेहाची ओळख पटणे देखील कठीण आहे. डीएनए चाचणीच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आग इतकी भयंकर होती की एसी बसचा फक्त सांगडा राहिलेला दिसत आहे. आग लागल्यानंतर प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्हाला वाचवा वाचवा असे मन हेलावणारे वाक्य कानावर पडत होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. काही जणांनी तर जीव वाचवण्यासाठी बसच्या काचामधून उड्या देखील मारल्या. या भयानक घटनेची दोन कारणं समोर आली आहेत.
जैसलमेरमध्ये खासगी एसी बस जळून खाक झाली. त्यात २० प्रवाशांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये शॉर्ट सर्किट मुळे (Short circuit in AC bus leads to deadly blaze in Rajasthan) आग लागली. त्यात काही प्रवाशांकडे दिवाळीचे फटाके होते.
नेमकी आग लागली कशी?
प्राथमिक माहतीनुसार, जैसलमेरमधून बसलेल्या काही प्रवाशांकडे फटाक्यांचे सामान होते. एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली आणि क्षणात बसमध्ये आग वाऱ्यासारखी पसरली. आगीत फटाके आल्यानंतर ती अधिक तीव्र झाली. आग फटाक्यांमुळे संपूर्ण एसी बसमध्ये पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. एसी बसमधून फटाके नेण्याची परवानगी नाही, तरीही फटाके नेण्यात आले याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जैसलमेरला पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली. दुर्घटनेतील जखमींना तातडीने उपचार मिळावे, असे निर्देश देखील त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा – आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय iPhone 16; खरेदीवर होईल हजारो रुपयांची बचत