Home / देश-विदेश / BoycottCampa: कॅम्पा कोला या जाहिरातीमुळे वादात का अडकला? नेमकं प्रकरण काय ?

BoycottCampa: कॅम्पा कोला या जाहिरातीमुळे वादात का अडकला? नेमकं प्रकरण काय ?

Campa Cola Controversy | रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा लाँच केलेला ‘कॅम्पा कोला’ हा भारतातील लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक ब्रँड सध्या मोठ्या वादाच्या...

By: Team Navakal
Campa Cola Controversy

Campa Cola Controversy | रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा लाँच केलेला ‘कॅम्पा कोला’ हा भारतातील लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक ब्रँड सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका जाहिरातीमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या प्रतिमेचा वापर केल्याने सोशल मीडियावर #BoycottCampa हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेकांनी कंपनीवर टीकेची झोड उठवली आहे.

एका पोस्टरमध्ये मंदिरासोबतच कॅम्पा कोलाची बॉटल दाखवण्यात आली आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक युझर्सनी कॅम्पा कोलावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. एका युझरने लिहिले, “कोणत्याही ब्रँडने व्यावसायिक फायद्यासाठी धार्मिक चिन्हांचा गैरवापर करू नये. कॅम्पा कोलाने त्वरित माफी मागावी.” दुसऱ्या युझरने म्हटले, “भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा ही जाहिरातीसाठी वापरण्याची वस्तू नाही. कॅम्पाने मर्यादा ओलांडली आहे.”

पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील एका वरिष्ठ सेवकानेही यावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा किंवा मंदिराचे पावित्र्य एखाद्या सॉफ्ट ड्रिंकशी जोडणे अस्वीकार्य आहे.” त्यांनी जाहिरात फलक तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा मंदिर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही दिला आहे.

रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर वाद

हा वाद रथयात्रेच्या मुख्य मिरवणुकीच्या आधी उफाळला आहे, ज्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आज (27 जून) पुरी येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथातून मिरवणुकीत काढल्या जाणार आहेत. अशा पवित्र प्रसंगी धार्मिक चिन्हांचा व्यावसायिक वापर केल्याने भाविकांमध्ये संताप आहे. सोशल मीडियावर #SaveJagannath आणि #BoycottCampa यासारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

दरम्यान, कॅम्पा कोला हा ब्रँड सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) अंतर्गत येतो. ऑगस्ट 2022 मध्ये रिलायन्सने ‘प्युअर ड्रिंक्स ग्रुप’कडून 22 कोटी रुपयांना हा ब्रँड विकत घेतला. मार्च 2023 मध्ये कॅम्पा कोला, ऑरेंज आणि लेमन या फ्लेवर्ससह पुन्हा लाँच झाला. मात्र, या जाहिरात वादावर रिलायन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या