Home / देश-विदेश / राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’ आरोपांवरून वाद, ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर 3 माजी निवडणूक आयुक्तांची टीका

राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’ आरोपांवरून वाद, ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर 3 माजी निवडणूक आयुक्तांची टीका

Vote Chori Allegations: काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या ‘व्होट चोरी’च्या (Vote Chori Allegations)...

By: Team Navakal
Vote Chori Allegations

Vote Chori Allegations: काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या ‘व्होट चोरी’च्या (Vote Chori Allegations) आरोपांवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेवर 3 माजी निवडणूक आयुक्तांनीच जाहीरपणे टीका केली आहे.

आरोप सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करा किंवा माफी मागा, या कुमार यांच्या भूमिकेवर माजी अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना 3 माजी निवडणूक आयुक्त, एस.वाय. कुरेशी, ओ.पी. रावत आणि अशोक लवासा यांनी व्होट चोरींच्या आरोपांवर भूमिका मांडली.

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन ‘व्होट चोरी’चा आरोप केला होता. त्यांनी कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघातील मतदार यादीचा हवाला देत, निवडणूक आयोग (ECI) आणि भाजप यांच्या संगनमताने निवडणुकांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप केला.

माजी आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी (Vote Chori Allegations)

एस.वाय. कुरेशी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या आक्रमक भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ‘राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते केवळ स्वतःचे मत मांडत नाहीत, तर कोट्यवधी लोकांचे मत मांडत आहेत. अशा व्यक्तीने आरोप केल्यावर निवडणूक आयोगाने संताप व्यक्त करणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले.

ओ.पी. रावत म्हणाले की, राहुल गांधींकडून प्रतिज्ञापत्र मागण्याऐवजी निवडणूक आयोगाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती. ‘एक सामान्य मतदार जरी शंका व्यक्त करत असेल, तरी आयोग त्याची गंभीर दखल घेऊन तपास करतो,’ असे रावत म्हणाले.

तसेच, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या मते, ‘गंभीर तक्रारींसाठी कोणाकडूनही प्रतिज्ञापत्राची मागणी करणे योग्य नाही. निवडणूक प्रणालीचा संरक्षक म्हणून आयोगाची जबाबदारी आहे की कोणताही संशय लोकांच्या मनात राहू नये.’

तसेच, तिन्ही माजी निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, भारतीय निवडणुका बहुतांश प्रमाणात स्वतंत्र आणि निष्पक्ष आहेत. ‘व्होट चोरी’चे आरोप हे ‘राजकीय ‘ असून, निवडणुकीच्या काळात नेहमीच केले जाणारे सामान्य दावे आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी कथित व्होट चोरींच्या आरोपाबाबत आणखी मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.


हे देखील वाचा –

काशी विश्वनाथ मंदिर कर्मचारी राज्य सेवक दर्जा ! पगार तिपटीने वाढणार

चोक्सीला तुरुंगात १४ सुविधा भारताचे बेल्जियमला आश्वासन

Web Title:
संबंधित बातम्या