छांगुर बाबाची पनामामध्ये हजारो डॉलर्सची गुंतवणूक

Chhangur Baba

लखनऊ – उत्तर प्रदेशातील छांगुर बाबाच्या धर्मांतर प्रकरणानंतर (religious conversion controversy)अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) त्याचा पनामाशी संबंध शोधून काढला आहे. छांगुर बाबाने (Chhangur Baba)नवीन रोहरा या व्यक्तीच्या मदतीने पनामामध्ये १० हजार डॉलर्स ($10,000)(अंदाजे ८.६२ लाख) गुंतवून एक शेल कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत काही परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.

लोगो मरीन नावाची ही कंपनी २००३ साली पनामामध्ये (Panama)नोंदणीकृत झाली होती. नवीन रोहरा (Naveen Rohra) यांचे कंपनीवर पूर्ण नियंत्रण होते. याची माहिती मिळाल्यानंतर ईडीने छापा टाकत नवीनच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. या कंपनीचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार (corruption) जाळे चालवत होता, असे राज्य विशेष तपास पथकाच्या तपासात आढळले. तो दररोज तीन तास तरुणांना कट्टर मौलवींचे व्हिडीओ दाखवत असे आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होता. हिंदू व इतर धर्मातील तरुणींना एका खोलीत डांबून ठेवून त्यांचे धर्मांतर करत असल्याचेही एसआयटी तपासात निष्पन्न झाले आहे.