Home / देश-विदेश / कोण आहेत अनिरुद्धाचार्य आणि अजित भारती? सरन्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर विधाने केल्याचा आरोप; कारवाईची मागणी

कोण आहेत अनिरुद्धाचार्य आणि अजित भारती? सरन्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर विधाने केल्याचा आरोप; कारवाईची मागणी

Chief Justice BR Gavai: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एका 71 वर्षीय वकिलाने थेट सरन्यायाधीश बी. आर. गवई (Chief Justice B...

By: Team Navakal
Chief Justice BR Gavai

Chief Justice BR Gavai: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एका 71 वर्षीय वकिलाने थेट सरन्यायाधीश बी. आर. गवई (Chief Justice B R Gavai) यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणी गवई यांच्यावर हल्ला करण्यासाठी भडकावल्याबद्दल दोन व्यक्तींविरुद्ध फौजदारी अवमान कार्यवाही सुरू करण्यासाठी अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

याचिका दाखल करण्याचे नेमके कारण काय?

सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोशल मीडियावर न्यायाधीशांविरुद्ध ‘हिंसाचार भडकावणारे’ अनेक पोस्ट्स व्हायरल झाले. मिशन आंबेडकर या संस्थेच्या संस्थापकाने दाखल केलेल्या याचिकेत धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य उर्फ अनिरुद्ध राम तिवारी आणि उजव्या विचारसरणीचे यूट्यूबर अजित भारती (Ajeet Bharti) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याचिकेनुसार, सरन्यायाधीशांवरील हल्ल्यापूर्वी धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर, या घटनेनंतर लगेचच यूट्यूबर अजित भारती यांनी सरन्यायाधीश गवई यांची खिल्ली उडवणाराएक व्हिडिओ पोस्ट केला होता.

याचिकेत नमूद केले आहे की, “ही विधाने आणि कृती माननीय सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांविरुद्ध हिंसाचार भडकावण्याच्या उद्देशाने आहेत. अशा सार्वजनिक चिथावणीचा स्वर अत्यंत धोकादायक असून, हे पोस्ट्स व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे समाजात तीव्र वादविवाद आणि तणाव वाढला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात असे वर्तन अभूतपूर्व आहे.”

याचिकेतील प्रमुख दावे

या याचिकेत, जर अशा व्यक्तींना न्याय मिळाला नाही तर ‘न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि आपल्या लोकशाहीचा पाया धोक्यात येऊ शकतो’ असे ठामपणे नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही न्यायालयाला किंवा न्यायाधीशाला भीती किंवा बाजू न घेता त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखले जाऊ नये, यावर याचिकेत जोर देण्यात आला आहे.

अनिरुद्धाचार्य यांच्यावर आरोप आहे की, विष्णू मूर्ती प्रकरणातील सरन्यायाधीशांच्या कथित टिप्पणीनंतर त्यांनी सरन्यायाधीशांना धमक्या दिल्या होत्या.

अनिरुद्धाचार्य हे वृंदावन येथील गौरी गोपाल आश्रमाचे संस्थापक आहेत आणि हिंदू धर्मग्रंथांवरील त्यांच्या कथाकथनाच्या शैलीमुळे ते सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत ते, “जर तुम्हाला छाती फाडून घ्यायची असेल, तर मला सांगा,” असे बोलताना ऐकू येतात.

अजित भारती हे वादग्रस्त यूट्यूबर असून न्यायव्यवस्थेविरुद्ध आक्षेपार्ह विधाने करण्याची त्यांची पार्श्वभूमी आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला झाल्यानंतर लगेचच त्यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचे याचिकेत म्हटले आहे.

हे देखील वाचा – रणजी सराव सामन्यात पृथ्वी शॉचा ‘हिट शो’! 181 धावांवर बाद होताच जुन्या सहकाऱ्यावर बॅट घेऊन धावला; पाहा व्हिडिओ

Web Title:
संबंधित बातम्या