Home / देश-विदेश / चीनचा अंतराळात नवा विक्रम! लेझरने चंद्रावर साधला अचूक वेध

चीनचा अंतराळात नवा विक्रम! लेझरने चंद्रावर साधला अचूक वेध

चीनच्या Tiandu-1 या उपग्रहाने प्रखर सूर्यप्रकाशात पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळात यशस्वी लेझर रेंजिंग (laser ranging) करून जगभरात पहिल्यांदाच असा प्रयोग...

By: Team Navakal
Earth-Moon laser ranging

चीनच्या Tiandu-1 या उपग्रहाने प्रखर सूर्यप्रकाशात पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळात यशस्वी लेझर रेंजिंग (laser ranging) करून जगभरात पहिल्यांदाच असा प्रयोग यशस्वी केला आहे. चीनच्या Deep Space Exploration Laboratory (DSEL) ने काही दिवसांपूर्वी हा प्रयोग केला.

हा प्रयोग म्हणजे पृथ्वीवरून उपग्रहावर अचूक लेझर पाठवणे व तो लेझर पुन्हा परत येणे. ही पद्धत उपग्रहाच्या अचूक स्थितीचे मोजमाप करण्यासाठी वापरली जाते. पण आतापर्यंत हा प्रयोग फक्त रात्रीच शक्य होता,कारण दिवसा सूर्यप्रकाशात लेझरचा सिग्नल हरवण्याची शक्यता असते.

हा उपग्रह मार्च 2024 मध्ये प्रक्षेपित झाला होता आणि तेव्हापासून तो चंद्राभोवती फिरत आहे. प्रयोगात, पृथ्वीवरील वेधशाळेतून उपग्रहाकडे लेझर किरणं पाठवण्यात आले. हे लेझर किरण परत आल्यावर उपग्रहापर्यंतचे अंतर अचूकपणे मोजता आले.

आता दिवसाही शक्य होणार चंद्र ट्रॅकिंग

DSEL च्या मते, हा प्रयोग म्हणजे अंतराळ संशोधनासाठी टेक्नॉलॉजीची मर्यादा ओलांडणारा टप्पा आहे. आता Tiandu-1 उपग्रह पृथ्वीवरून कधीही ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे डेटा संकलनात वाढ होणार असून, भविष्यातील चंद्र आणि खोल अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरणार आहे.

DSEL ने सांगितलं की हा प्रयोग म्हणजे जणू 10 किमी अंतरावरून एका केसावर नेम साधणे. Tiandu-1 सुमारे 1,30,000 किमी अंतरावर असताना वैज्ञानिकांनी त्याच्यावरून परत आलेला लेझर सिग्नल नोंदवला आहे. ही एक अभूतपूर्व कामगिरी मानली जात आहे.

Tiandu-1, Tiandu-2 आणि Queqiao-2 या उपग्रहांचे मार्च 2024 मध्ये एकत्रित प्रक्षेपणे करण्यात आली. यामागे चंद्रावर संवाद आणि नेव्हिगेशन नेटवर्क तयार करण्याचा उद्देश आहे. चीन आणि रशिया 2030 पर्यंत मानवयुक्त चंद्र लँडिंग आणि 2035 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक संशोधन तळ उभारण्याच्या तयारीत आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या