Home / देश-विदेश / ‘आपल्या समाजात अशा कृत्यांना…’; सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर मोदींची पहिली प्रतिक्रिया

‘आपल्या समाजात अशा कृत्यांना…’; सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर मोदींची पहिली प्रतिक्रिया

CJI BR Gavai Attack: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI BR Gavai) यांच्या दिशेने शूज फेकण्याचा प्रयत्न...

By: Team Navakal
CJI BR Gavai Attack

CJI BR Gavai Attack: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI BR Gavai) यांच्या दिशेने शूज फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे तीव्र संताप व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेला हा हल्ला प्रत्येक भारतीयाला संताप आणणारा आहे. अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही. ते पूर्णपणे निंदनीय आहे.” मोदींनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी संवाद साधून, त्यांनी अशा परिस्थितीतही दाखवलेल्या शांतपणाचे कौतुक केले.

नेमके काय घडले?

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ वकिलांकडून प्रकरणांची यादीऐकत असताना ही घटना घडली. राकेश किशोरनावाच्या 71 वर्षीय वकिलाने थेट व्यासपीठाकडे धाव घेतली आणि आपला बूट काढून न्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्वरित हस्तक्षेप करत त्या वकिलाला जागेवरून हटवले आणि तो हल्ला होण्यापासून थांबवला.

या वकिलाला बाहेर घेऊन जात असताना, तो ‘सनातचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत होता.

संताप आणि कारवाई

यापूर्वी मध्य प्रदेशातील खजुराहो येथील हिंदू मंदिर संकुलातील एका जुन्या मूर्तीबाबत सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने या वकिलाचा प्रॅक्टिस परवाना निलंबित केला आहे.

सरन्यायाधीश गवई आणि सर्वोच्च न्यायालयाने या वकिलावर कोणताही आरोप (Charges) व कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला पोलिसांनी नंतर सोडून दिले.

राजकीय नेत्यांकडून तीव्र निषेध

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी या घटनेला केवळ सरन्यायाधीशांवरील हल्ला नव्हे, तर आपल्या संविधानावरील हल्ला असल्याचे म्हटले. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याला आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

हे देखील वाचा – Bihar vidhan sabha election: बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या