CJI Gavai Shoe Throw Incident: सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Gavai) यांच्यावर 71 वर्षीय वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या धक्कादायक घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. या कृतीनंतर विविध स्तरांतून निषेध व्यक्त होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी थेट दिल्ली येथे जाऊन राकेश किशोर यांची भेट घेतली.
निलेश लंके यांनी भेटून काय स्पष्ट केले?
खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तसेच संविधानाची प्रत भेट देण्याचा प्रयत्न केला. ही भेट वकिलास समर्थन देण्यासाठी नव्हती, तर त्यांना संविधानाच्या मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी होती, असे लंके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
“राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित आणि मनुवादी विचारातून घडली आहे. त्यांना संविधानाचा विसर पडला आहे. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे,” असे लंके म्हणाले.
“सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला, तो एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता. या कृत्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी मी इथे आलो आहे. वकिलाचे वय 70 असल्याने, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी त्यांना गांधीवादी विचारातून समज देणे योग्य वाटले” असे त्यांनी स्पष्ट केले.
निलेश लंके यांचा अजून एक स्टंट,आपल्या महाराष्ट्र मधील खासदारांना स्टंट करण्याचे डोहाळे लागले आहेत जणू ,
— शुभम कराड (@shubham_9909) October 9, 2025
शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके राकेश किशोर यांच्या घरी पोहोचले 🤣🤣, संसद बंद पाडायची भाषा करणारे आता लोकांच्या दारात जात आहेत.
नगरच्या लोकांनी चांगला खासदार निवडून दिला… pic.twitter.com/yshf9Fn9Cu
सरन्यायाधीशांची शांत भूमिका आणि वकिलावर कारवाई
या घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी अविचल राहत कामकाज सुरूच ठेवले आणि वकिलाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. घटनेच्या तीन दिवसांनंतर त्यांनी यावर भाष्य करताना, “जे घडले तो आमच्यासाठी एक संपलेला धडा आहे. अशा घटनांचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, राकेश किशोर यांनी आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले. एका धार्मिक प्रकरणावरील न्यायालयाच्या वक्तव्याने आपण दुखावलो गेल्यामुळे हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) ने तातडीने कठोर कारवाई करत राकेश किशोर यांची तात्पुरती सदस्यता रद्द केली आहे, तसेच त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
हे देखील वाचा – MNS letter: आड मार्गाने हिंदी लादू नये! त्रिभाषा समितीला मनसेचे पत्र