Home / देश-विदेश / Bihar Election 2025 : बिहारमधील पराभवानंतर तरी काँग्रेसचे डोळे उघडणार का?

Bihar Election 2025 : बिहारमधील पराभवानंतर तरी काँग्रेसचे डोळे उघडणार का?

Bihar Election 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. आणि याच बरोबर पुन्हा एका भाजपाची ताकत देखील पाहायला...

By: Team Navakal
Bihar Election 2025
Social + WhatsApp CTA

Bihar Election 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. आणि याच बरोबर पुन्हा एका भाजपाची ताकत देखील पाहायला मिळाली. विजय असला तर पराभवाच नाव देखील जोडलं जातच. अगदी तसच तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला या पराभवाचा समना करावा लागला आहे. एक्सिट पोलमध्ये देखील सत्ताधारी एनडीएलाच स्पष्ट बहुमत मिळणार असलयाचे दिसून येत होते. आणि झालं हि अगदी तसाच निकालाच्या अगदी सुरवातीलाच एनडीएला आघाडी मिळताना दिसत होती. सहाजिक रित्या विरोधी पक्षाकडून नाराजी हि वर्तवली जाणारच होती. आणि यावर टीकांचे सत्र सुरु झाले.

या निकालांवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची छाप स्पष्टपणे दिसत असल्याची जहारीली टीका देखील काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली. या आधीची काही वर्ष सोडली तर काँग्रेसने भारतावर बरच राज्य केलं आहे. पण आता त्यांच भारतातल अस्तित्व संपुष्टात येत कि काय अश्या चर्चाना आता चांगलंच उधाण आलं आहे.

बिहारमधील प्रचार किंवा इतक्या वर्षात चालवली सत्ता यामुळे जनता खोलवर दुखावली गेली आहे का असा सवाल देखील आता उत्पन्न होताना दिसत आहे. काँग्रेसमध्ये चालत असणारी आपसी मतभेद हे कोणापासूनच लपले नाहीत. आणि मागच्या काळातील खराब कामगिरीचे पडसाद या निवडणुकीवर पडताना दिसत आहेत. आणि हा निकाल त्याचच एक जिवंत उदहारण असल्याचे देखील बोलले जाते. या आधी म्हणजेच २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाआघाडीचा भाग म्हणून ७० जागांवर उमेदवार दिले गेले होते. त्यापैकी पक्षाला केवळ १९ जागांच्या विजयातच समाधान मानावे लागले. आणि आता या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ९.६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी पक्षाने केलेल्या अत्यंत खराब कामगिरीचा महाआघाडीला फटका बसलायचे देखील बोलले जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अतिशय रसातळाला गेली असल्याचे चित्र आहे. यावेळी पक्षाने तब्बल ६१ जागांवर उमेदवार दिले होते; पण त्यापैकी केवळ सहा ते सात जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले. काँग्रेसला बिहारमध्ये योग्य रित्या प्रचार करता आला नाही शिवाय त्यांना बिहारच्या जनतेच्या मनात आपले आधीचे स्थान अढळ करता आले नाही.

बिहारमधील सामाजिक समीकरणाचे वास्तव ओळखण्यातही काँग्रेसला अपयश आल्याचे दिसून येत आहे. या आधीच्या काळात काँग्रेसचा प्रचंड दबदबा होता. तो दबदबा आणि काँग्रेसची जुनी पारंपरिक मत सांभाळून ठेवण्यात काँग्रेस मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली. आणि हे सगळं कमी कि काय म्हणून ऐन तोंडावर विधानसभा निवडणुकीच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलून काँग्रेसने आपल्या समस्यांमध्ये आणखीच वाढ करून घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या अपयशाचे कारण खोलवर जाऊन शोधणे अत्यंत गरजेचे आहे.


हे देखील वाचा –Airless Tyres : पंक्चर आणि हवेचं टेन्शन संपलं! एअरलेस टायर्स नेमके कसे काम करतात? जाणून घ्या

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या