Death Threat – द वॉशिंग्टन पोस्ट (Washington Post) या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रातील स्तंभलेखिका आणि प्रख्यात शोध पत्रकार राणा अय्यूब (Journalist Rana Ayyub)यांना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲपवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
राणा अय्यूब यांनी एक्स पोस्टद्वारे (X post.)ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून (International numbe) वारंवार व्हॉट्सॲप कॉल आले. त्यांनी हे कॉल उचलले नाहीत. त्यानंतर संबंधित व्यक्तीने धमकीचा संदेश (Threatening message) पाठवला.
त्या संदेशात म्हटले होते की, तुम्ही द वॉशिंग्टन पोस्टमध्ये १९८४ चे शीख हत्याकांड (Sikh massacre) आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (former Prime Minister Indira Gandhi) यांच्या खुनांवर गौरव करणारे लेख लिहा. अन्यथा तुमच्या घरी शूटर्स पाठवून न्यू इयर साजरा करू. तुमचा पत्ता आणि सर्व माहिती आमच्याकडे आहे. तुम्ही आणि तुमचे वडील अजनगढ (Ajnagadh)येथे आहात. तुम्हाला मारण्यात येईल. योगी आणि त्यांची पोलीसदेखील काही करू शकणार नाहीत.
धमकी आलेल्या नंबरचा व्हॉट्सॲप डीपी ही कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची (Gangster Lawrence Bishnoi)आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी धमकीचा गुन्हा नोंदवून तपास सायबर शाखेकडे सोपवला आहे.
हे देखील वाचा –
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दुबईहून बेपत्ता
देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली !गरीब- श्रीमंतांमधील दरी वाढत चालली









