Delhi Air Pollution : दिल्लीत दिवाळी साजरी झाल्यानंतर दोन दिवसात दिल्ली प्रदूषणामुळे पूर्णपणे व्यपून गेली आहे. दिल्लीचा हवेचा दर्जा निर्देशांक खालावला आणि तो ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत आला, आज सकाळी ५.३० वाजता हा निर्देशांक ३४५ वर पोहोचला. दिल्लीच्या काही भागात सकाळी ६.१५ वाजता ३८० एक्यूआय नोंदवण्यात आला, ज्यामध्ये अशोक विहार, बवाना आणि दिलशाद गार्डन यांचा समावेश आहे.
दिल्लीतील क्षेत्रनिहाय एक्यूआय: सीपीसीबीनुसार, सकाळी ८ वाजेपर्यंत बवानामध्ये ४२३ एक्यूआय (Air Quality Index) नोंदवण्यात आला, जहांगीरपुरीमध्ये ४०७ इतका एक्यूआय होता आणि वजीरपूरमध्ये ४०८ एक्यूआय असलेले क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत आणि हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत येते. आनंद विहारमधील AQI ३५८, अशोक विहार ३८९, बुरारी क्रॉसिंग ३९९, चांदणी चौक ३५०, IGI विमानतळ (टर्मिनल 3) ३०२, ITO ३४२, लोधी रोड ३२२, मुंडका ३६६, नजफगढ, पंजाबी ३३६, पतंगरे ३७६. इतका नोंदवण्यात आला आहे.

देशातील इतर सात महानगरांच्या तुलनेत दिल्लीत सर्वाधिक AQI (Air Quality Index) होता. दिल्लीतील भागात AQI ४५० पर्यंत नोंदवले गेले, तर सर्व महानगरांमध्ये सर्वात स्वच्छ हवा बेंगळुरूमध्ये नोंदवली गेली, सकाळी ८ वाजता AQI ९५ होता. मुंबईतील हवेची गुणवत्ता देखील ‘खराब’ श्रेणीत नोंदवली गेली असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा – Ranveer Deepika Baby: दीपिका-रणवीरची लेक ‘दुआ’ कोणासारखी दिसते? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर केला मुलीचा फोटो