Delhi Car Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी घटना (Terrorist Incident) म्हणून घोषित करत तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने दिले आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत लाल किल्ल्याजवळील कार स्फोटात बळी पडलेल्या निरपराध लोकांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आणि दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दोषींवर कोणताही विलंब न करता कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या हल्ल्यात बळी पडलेल्यांप्रति शोक व्यक्त करणारा ठराव (Resolution) मंजूर करण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा ठराव वाचताना सांगितले की, 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ देशविरोधी शक्तींनी कार स्फोट घडवून जघन्य दहशतवादी कृत्य केले. मंत्रिमंडळाने हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करत जखमी लोक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.
त्वरित तपास करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्रिमंडळाने दिले आहेत. सरकारने ठणकावून सांगितले की, दोषींना लवकरच ओळखले जाईल आणि कोणत्याही विलंबाशिवाय त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
Govt of India terms the Delhi blast a "terrorist incident" by "anti-national forces" https://t.co/dQ3XyG16af pic.twitter.com/d3GQgsy2ze
— ANI (@ANI) November 12, 2025
आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि देशातील एकता
मंत्रिमंडळाने या स्फोटाला ‘भ्याड आणि घृणास्पद कृत्य’ असे संबोधले. भारत दहशतवादाच्या कोणत्याही स्वरूपाला खपवून घेणार नाही, असे या बैठकीत पुन्हा स्पष्ट करण्यात आले. या कठीण काळात जागतिक स्तरावरील विविध देशांच्या सरकारांनी भारत सरकारला दिलेल्या एकजूट आणि समर्थनाबद्दल मंत्रिमंडळाने विशेष आभार मानले.
यावेळी संकटकाळात सुरक्षा यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी दाखवलेल्या साहस आणि तत्परतेची प्रशंसा करण्यात आली. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सुरक्षेप्रती आपली अटूट बांधिलकी पुनरुच्चारित करत सांगितले की, दहशतवादी घटनांच्या तपासाला व्यावसायिक पद्धतीने आणि त्वरित गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा –









