Home / देश-विदेश / राजा रघुवंशी हत्येप्रकरणी नार्को चाचणीची मागणी

राजा रघुवंशी हत्येप्रकरणी नार्को चाचणीची मागणी

शिलाँग- संपूर्ण देशात गाजलेले राजा रघुवंशी हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. न्यायालयात ही मागणी...

By: Team Navakal
raja raghuvanshi case


शिलाँग- संपूर्ण देशात गाजलेले राजा रघुवंशी हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. न्यायालयात ही मागणी करण्यासाठी आपण शिलाँगला जाणार असल्याची माहिती राजा रघुवंशी याच्या भावाने दिली आहे.
राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी म्हटले की, नार्को टेस्टची मागणी करण्यासाठी शिलाँग उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी आम्ही तीन वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर उच्च न्यायालयात हे अपील फेटाळण्यात आले तर रघुवंशी कुटुंब सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. माझ्या भावाला का मारले हे मला अद्याप कळलेले नाही. मला अशी शंका आहे की यामध्ये एखादे मोठे नेटवर्क सामील असावे. नार्को चाचणीतून या नेटवर्कविषयीची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. मात्र मेघालय पोलिसांना नार्को टेस्ट करायची नाही. मी पोलिसांच्या कामावर समाधानी आहे , पण हत्येचे नेमके कारण समोर येणे आवश्यक आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या