Devendra Fadnavis Bihar Election : बिहारच्या (Bihar) खगडिया जिल्ह्यात निवडणुकी प्रचारादरम्यान एक घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) मंचावर बसताना तेथील खुर्ची अचानक तुटली असल्याचे समोर आले आहे. यामुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळाचे वातावरण होते. पण सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समोर आले. सुरक्षारक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. काही मिनिटांतच कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. फडणवीस यांनीही ही घटना सामंजस्याने घेत प्रेक्षकांना हात हलवून अभिवादन केले आणि म्हणाले, “सर्व काही ठीक आहे, आता कामाला लागूया!”
नेमका प्रकार काय?
एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ रविवारी ही भव्य सभा आयोजित केली होती. फडणवीस आणि पासवान व्यासपीठावर पोहोचल्यानंतर ते आपल्या नियोजित खुर्च्यांवर बसत असतानाच, खुर्चीचा पाय अचानक तुटला आणि फडणवीस संतुलन गमावून खाली पडले. या घटनेमुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आयोजकांनी तात्काळ नव्या खुर्च्या आणल्या आणि सभा पुन्हा सुरू केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) स्टार प्रचारक म्हणून बिहारमध्ये दाखल झाले होते.
बिहार विधानसभा निवडणूक २०२५च्या (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्यापूर्वी एनडीएची प्रचारमोहीम वेग पकडत असल्याचे दिसून येत आहे . रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा क्षेत्रात एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ आयोजित भव्य सभेत हा प्रसंग घडला.
हे देखील वाचा –
State Election Comission : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद..
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








