Home / देश-विदेश / Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद अपघातानंतर मोठा निर्णय! एअर इंडियाच्या सर्व ‘ड्रीमलाइनर’ विमानांची सुरक्षा तपासणी होणार

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद अपघातानंतर मोठा निर्णय! एअर इंडियाच्या सर्व ‘ड्रीमलाइनर’ विमानांची सुरक्षा तपासणी होणार

Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघातानंतर (Air India Plane Crash) नागरी विमान वाहतूक...

By: Team Navakal
Ahmedabad Plane Cras

Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघातानंतर (Air India Plane Crash) नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) तातडीने कठोर पावले उचलली आहेत. DGCA ने एअर इंडियाच्या बोइंग 787-8 आणि 787-9 ड्रीमलाइनर विमानांच्या ताफ्याची सुरक्षा तपासणी अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.

अहमदाबाद येथील या भीषण अपघातात विमानातील केवळ एक व्यक्ती वाचली, तर इतर सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भारताच्या विमान नियामक संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

बोइंग ड्रीमलाइनरवर विशेष लक्ष

एअर इंडियाच्या GenX इंजिन असलेल्या बोइंग ड्रीमलाइनर विमानांची आता कसून सुरक्षा तपासणी (Safety checks for Air India Planes) होणार आहे. DGCA ने खालील प्रमुख तपासण्यांवर भर दिला आहे:

  • इंधन मापदंडांचे निरीक्षण आणि संबंधित प्रणालींची पडताळणी.
  • केबिन एअर कंप्रेसर आणि त्याच्याशी संबंधित प्रणालींची तपासणी.
  • इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टमची चाचणी.
  • इंजिन फ्यूल-ड्रिव्हन ॲक्ट्यूएटर आणि ऑइल सिस्टीमची कार्यक्षमता तपासणी.
  • हायड्रॉलिक प्रणालीच्या कार्यक्षमतेची तपासणी.
  • टेक-ऑफ मापदंडांचे पुनरावलोकन.

याशिवाय, पुढील दोन आठवड्यांमध्ये ‘पॉवर ॲश्युरन्स चेक’ आणि ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ देखील केले जाणार आहेत. गेल्या 15 दिवसांत बोइंग ड्रीमलाइनर विमानांमध्ये सातत्याने आढळलेल्या तांत्रिक अडचणींचे तातडीने पुनरावलोकन करण्याचे आणि त्यानंतर आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेशही DGCA ने दिले आहेत. या कठोर तपासणीमुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title:
संबंधित बातम्या