Diwali Firecrackers : दिवाळी (Diwali) खर तर हा सण जितका पवित्र मानला जातो तितकच त्या सणाचं महत्व सुद्धा अधिक आहे. दिव्यांची आरास म्हणजे या सणाचं केंद्रस्थान असत. तसेच दिवाळी आजून एका गोष्टीमुळे ओळखली जाते ते म्हणजे फटाके. यंदा भारतातील (Indians) जनतेने फटाक्यांवर (Firecrackers) तब्बल सात हजार कोटी रुपये इतका प्रचंड दौलतजादा केला. थोडक्यात तितक्या रकमेचं प्रदूषण केलं. दिवाळीत प्रदूषण होणं म्हणजे परंपराच आहे जणू. पण खरच फाट्यांसारख्या प्रचंड धूर, प्रदूषण करणाऱ्या गोष्टींवर इतका पैसा खर्च करणे योग्य आहे का? पण यावर समंजस पणाने बोलणे म्हणजे मूर्खपणाचे.

पूर्वीच्या काळी होणारे सण हे आताच्या काळातील सण साजरेकरण्याच्या पद्धतीच्या कैइक पटीने सुरक्षित आणि पवित्र्याने भरलेले होते. विश्वरूप सामावून घेणाऱ्या भगवान कृष्णाच्या बाललीलांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गोपाळकाल्याच्या उत्सवात अनेकांनी नवीन प्रथा आणल्या यात १० थरांच्या हंड्यायांचा देखील समावेश आहे. खरंच जीवाची बाजी लावून सण साजरे केले जातात? ज्ञानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणेशाच्या उत्सवातील मिरवणुकीत कान फाटतील आणि बहिरेपण येईल कि काय अशी भीती वाटते. पण काही असे भक्त सुद्धा असतात जे खरच सज्जनपणे पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करतात.
या सगळ्याचा अंतिम अध्याय म्हणजे दिवाळी. खरे तर अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणाऱ्या या मोठ्या उत्सवात एकेकाळी कमालीची कलात्मकता होती. मग ते आकाशदिवे असोत की सुंदर रेखाटलेली रांगोळी. शिशिराचे पायरव अंगावर रोमांच उभे करू लागले असताना पहाटेच्या दवात झगमगते आकाशदिवे आसमंताच्या जोडीने मनाचा कोपराही एकेकाळी उजळत छान उटणं लावून सुंदर दव्यांच्या सानिध्यात पहिली आंगोळं केली जायची.
त्या आठवणींकडे स्मृति असे म्हणून त्यास नाके मुरडायची सोय असली तरी देखील सणउत्सवाचे सध्याचे विचित्र आणि भयावह स्वरूपही नाकारता येणारे नाही. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फक्त मुंबईत आगीच्या अनेक घटना घडल्या त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुद्धा झाली. आगीच्या विविध तक्रारींमुळे अग्निशमन दलास कोणत्याही प्रहरी आमंत्रण यायचे. हवेचा दर्जा दिल्लीकरांनी इतका जास्त खलवला आहे कि त्यात श्वास घ्यायचा कि नाही असे सुजाण नागरिकाला वाटते. खर तर हे फक्त आपण दृश्यस्वरूपात पाहू शकतो पण फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी निसर्गाची, प्राणीपक्ष्यांची, वृद्धांची जी काही अवस्था झाली असेल तिची आपण कल्पनाही करू शकत नाही. अर्थात आनंदी उत्सव आणि सध्याचे वास्तव यातील फरक समजून घेण्याची बौद्धिक, सांस्कृतिक कुवतही असणे तितकेच गरजेचे.

तसे पाहता वास्तविकरित्या दिल्लीच्या तुलनेत समुद्रसान्निध्यामुळे मुंबईस निसर्गाची साथ अधिकची आहे. वाहत्या वाऱ्यांमुळे धूळ मुंबईत सहज दूर होते. दिल्लीतील ३५ पैकी ३३ हवामान क्षेत्रांत या काळात हवेची गुणवत्ता इतकी घसरली की श्वास घेणे सुद्धा कठीण वाटायला लागले. मुंबईदेखील आता त्या दिशेने पावले वळताना दिसत आहेत. जे सृजन नागरिक आहेत ते वारंवार यावर विरोध सुद्धा दर्शविताना दिसतात. आणि नवल म्हणजे राजकारणी सुद्धा बऱ्याचदा यावर योग्य प्रतिक्रिया देताना देखील दिसतात. पण वारंवार होणारे प्रदूषण याने मात्र सुजाण नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळते.
यंदा तर या फटाक्यांवर भारतीयांनी तब्बल सात हजार कोटी रुपये इतका प्रचंड खर्च केला. ही इतकी रक्कम मध्य प्रदेश, महाराष्ट्र अश्या अनेक राज्यांतील महामार्ग उभारणीसाठी अलीकडे मंजूर केली गेली. खर तर लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठीही साधारण एवढ्याच रकमेचा उपयोग होणार आहे. आणि दिवाळीत आपण इतक्या रकमेचं प्रभूषण करून ठेवलं. प्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी मागच्या बऱ्याच काळात सौर ऊर्जा, विजेवरील वाहने आली कारण प्रदूषण नियंत्रित व्हावे. आणि दुसरीकडे सणासुदीच्या काळात स्वत:च्या हाताने हवा, पाणी, प्रकाश अशा सगळ्यांचेच प्रदूषण करायचे. पण याला अपवाद म्हणून अजूनही काही सुजाण नागरिक भारतात आहेत जे या सगळ्या विरोधात योग्य लढा देताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात प्रदुषणा सारखं मोठं संकट कधीही भारतावर येऊ नये हीच इच्छा.
हे देखील वाचा –